विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण व कोरडे हवामान होत आहे. पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची विश्रांती कायम राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण असल्याने उद्यापासून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपुर, पानिपत, मीरुत, गोरखपुर, पासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत सक्रिय आहे. मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ईशान्य राजस्थान आणि लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात चक्रीय स्थिती सक्रिय झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर असल्याने पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान मंगळवारी 24 तारखेच्या सकाळपर्यंत मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने बहुतांश ठिकाणी पावसाने उसंत घेतली. पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक 26 रोजी कोकणात काही ठिकाणी, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला. मंगळवारी 24 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत ब्रह्मपुरी ईथर 34. ८ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान राज्यात बुधवारी तुरळक सरी बरसण्याची शक्यता आहे. गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.