पुण्यासह ‘या’ भागात माध्यम ते तीव्र पावसाची शक्यता; 1 ऑगस्ट पर्यंत कशी असेल स्थिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशातच हवामान वैभागाने राज्यातील काही भागासाठी पावसाच्या बाबतीत यलो अलर्ट जरी केला आहे. पुढील ३ तासात नाशिक , पुणे या जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस . होसाळीकर यांनी ट्विटर द्वारे दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवामान विभागाने २८ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान असणाऱ्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यापुरवी राज्यातल्या काही भागात ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला होता मात्र आता १ ऑगस्ट पर्यन्त यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यात पुणे , सातारा , कोल्हपूर नाशिक, ठाणे ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुढील तीन तासात ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती मुंबईच्या हवामान खात्याने दिली आहे. नुकत्याच दर्शवलेल्या सॅटेलाईट माहितीनुसार महाराष्ट्र वर काही प्रमाणात ढग विखुरले आहेत तर मध्यप्रदेश, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश झारखंड येथे दाट ढगांच्या सभोवतालचे वातावरण दिसून आले आहे.