राज्यात हुडहुडी…! 12-15 नोव्हेंबर दरम्यान ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ताज्या प्राप्त माहितीनुसार आज दिनांक १२ रोजी सर्वात कमी तापमान जळगाव येथे १०. ६ अंश सेल्सिअस इतके नोंदवलं गेले आहे. तर त्या खालोखाल पुण्यात किमान तापमान ११. ९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर रत्नागिरी इथे कमाल तापमान ३५. ३ अंश सेल्सिअस तर त्याखालोखाल अलिबाग यथे ३५.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. दरम्यान राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र गारठले …

उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात गारठा चांगलाच वाढू लागला राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान 14 अंश यांच्या खाली गेले असून राज्यात पहाटेच्यावेळी धुके पडत असून सायंकाळनंतर गारठा वाढू लागला आहे. विदर्भात मात्र किमान तापमानात वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे गुरुवारी अकरा रोजी सकाळी ही प्रणाली चेन्नईपासून 130 किलोमीटर तर पुदुच्चेरी पासून 150 किलोमीटर होती गुरुवारी सायंकाळी ही प्रणाली जमिनीवर येण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाब कायम आहे तर बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर उद्या तारीख 13 रोजी नव्यानं कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

राज्यात पावसाला पोषक हवामान
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज दिनांक 12 रोजी सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे तर रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.