Chor Bt Cotton: चोर बीटी कापूस आहे तरी काय? शेतकऱ्यांनो समजून घ्या, या वाणामुळे होणारे नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: विदर्भ, मराठवाड्यात खरीपात मोठ्या प्रमाणात बीटी कापसाची (Chor Bt Cotton) लागवड केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी तेलंगणातील कृषी केंद्रांवर गर्दी करून चोर बीटी कापसाचे वाण खरेदी करतात. तेलंगणाच्या (Telangana State) तुलनेत महाराष्ट्रातील बीटी कापूस बियाणे स्वस्त दरात आहे. तरीही शेतकरी अधिक दर देऊन तेलंगणातील कृषी केंद्रातून चोर बीटी कापूस (Chor Bt Cotton) बियाणे खरेदी करीत आहेत. काय आहे या मागचे रहस्य जाणून घेऊ या.

चोर बीटी बियाणे काय आहे? (Chor Bt Cotton)
कपाशीचे चोर बीटी वाण बीजी-3 (BG -3 Cotton) या नावाने ओळखले जाते. चोर बीटी (बीजी-3) या कापसाच्या वाणाला अद्याप शासनाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने या बियाण्यांवर बंदी आहे (Bt Cotton Banned In India). मात्र तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) आणली जातात. मागील काही वर्षांपासून शेतकरी कापूस पिकाकडे (Cotton Crop) वळले आहेत. चंद्रपूरमधील सीमावर्ती चामोर्शी, सिरोंचा, मुलचेरा या तालुक्यांमध्ये दरवर्षी कापसाचा पेरा (Cotton Cultivation) वाढत चालला आहे. कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकर्‍यांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तण नाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी (Herbicide Spraying) करतात.
तण नाशकाची फवारणी केल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावरही होतो. मात्र चोर बीटी (Chor Bt Cotton) या कापसाची लागवड केल्यास या पिकावर तणनाशकाचा काहीच परिणाम होत नाही (Herbicide Tolerant Bt Cotton). त्यामुळे चोर बीटी कापसाची लागवड करून मोठ्या प्रमाणात शेतकरी तणनाशकांचा वापर करतात.

चोर बीटी बियाण्यांमुळे होणारे नुकसान

तणनाशकाच्या अति वापरामुळे शेतजमीन पूर्णपणे नापीक होते. तसेच पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो. अतिशय घातक असलेली तणनाशके वापरली जात असल्याने मानवाला कॅन्सर होतो किंवा त्याचा मृत्यू सुध्दा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चोर बीटी (Chor Bt Cotton) या बियाण्यांवर बंदी घातली आहे. थोड्याशा फायद्यासाठी शेतकरी या वाणाची लागवड करून स्वत:चा आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे पर्यावरणाचे सुद्धा नुकसान होत आहे.

तेलंगणातही या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित बियाणे गडचिरोली, चंद्रपूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आणले जात आहेत. या वाणाची चोरून लागवड केली जाते, म्हणूनच कदाचित या वाणाला चोर बीटी कापूस म्हणतात.

बंदी असलेल्या चोर बीटी कपाशी (Chor Bt Cotton) लागवडीला यंदा चाप बसला. मात्र, सीमावर्ती भागातील शेतकर्‍यांनी महाराष्ट्राऐवजी तेलंगणातील कृषी केंद्रांतून सर्वाधिक कापूस बियाणे खरेदी केली आहेत. बियाणे खरेदीसाठी येथील शेतकरी तेलंगणातील शिरपूर, आशिफाबाद व कागजनगर येथील कृषी केंद्रांमध्ये जात आहेत. तोहोगाव व लाठी परिसरातील शेतकरी कापूस बियाण्यांसाठी तेलंगणात शेकडो किलोमीटर प्रवास करीत आहेत.

तेथील विक्रेते दुसर्‍या शेतकर्‍यांच्या नावावर बिल फाडत असल्याने बियाणे उगवले नाही तर भरपाईपासून मुकावे लागणार आहे.

गोंडपिपरी तालुक्यात कुठलाही उद्योग नाही. केवळ शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. मात्र कधी नैसर्गिक, तर कधी सुलतानी संकटाचा सामना येथील शेतकर्‍यांना करावा लागतो. बहुतांश शेती नदीकाठावर असल्याने दरवर्षी पुराचा धोका असतो. या भागातील शेतकरी बंदी असलेले चोर बीटी बियाणे (Chor Bt Cotton) लागवड करीत होते. मात्र, हे बियाणे आता विश्वासाचे राहिले नाही. त्यामुळे शेतकरी वैध बियाण्यांकडे वळले आहेत. इतर शेतकर्‍यांनीही यातून धडा घेऊन मान्यता प्राप्त बियाणे खरेदी करूनच लागवड करावी.