डेअरी बंद करा वायनरी काढा ; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीची परवानगी मिळणार असल्याची घोषणा केली. यानंतर वोरोधकांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु केला असून शेतकरी नेते आणि माजी मंत्री यांनी देखील या घोषणेवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ही महाविकास आघाडी नव्हे मद्यविकास आघाडी आहे. असे म्हंटले आहे.

याबरोबरच पुढे बोलताना ते म्हणाले , गावातल्या डेअरी बंद करा आणि वायनरी काढा. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने साखर कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी, मग आम्ही समजेल की तुम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत आहे, अशी मागणी खोत यांनी केली आहे. तसेच एसटी मधला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार संपायला तयार नाही. कामगारांच्या मनात धास्ती आहे, लालपरी वाचणार नाही, असेही खोत म्हणाले आहेत. हा येणारा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असेल, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत , राज्य सरकारकडे पैसेच नाहीत त्यांच्या योजना या केंद्राच्या पैशातून चालू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.