राज्यात थंडीचा कडाका वाढणार; देशाच्या ‘या’ भागात थंडीची लाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ आणि मराठवाडा मध्ये मागील दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट झाली. त्यानंतर आता राज्याच्या किमान तापमानामध्ये घट झाली आहे. आज सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा वाढला राज्यात हा गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागील तीन दिवसांपासून विदर्भाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची तुरळक ठिकाणी हजेरी लागली होती त्याचबरोबर यवतमाळ, अकोला, नागपूर, वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गारपीटही झाली होती. येत्या पाच दिवस मात्र विदर्भात मुख्यतः कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने दिला आहे. गेली तीन दिवसातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मात्र नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना मदतीचे आस लागून आहे.

या भागात थंडीची लाट
दरम्यान भारतात उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढू लागला असून पंजाब, हरियाणा ,चंदीगड, दिल्ली ,राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे .मध्य भारताच्या व महाराष्ट्राच्या किमान तापमानात दोन ते चार अंशांची घट होण्याची शक्यता आहे.