2022 मध्येही कापसाच्या दरात तेजी कायम राहणार ; राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर हे कापसाचे दर वाढलेले असलेले पाहायला मिळतात. दोन्ही बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात तेजी असल्याचे दिसून येते आहे. कापसाच्या मागणीला वाढ आहे मात्र त्या तुलनेने पुरवठा कमी आहे आणि हेच समिकरण 2022 मध्ये देखील सुरू आहे . याचाच लाभ कापूस बाजाराला होतोय. तसेच उन्हाळ्यात कॉटनच्या कपड्यांना मागणी वाढते. त्यामुळे कापड उद्योगांनी कापूस खरेदी सुरू केली आहे त्यामुळे बाजारात कापसाचे दर टिकून आहेत. देशात सध्या कापसाचे दर नऊ हजार पाचशे ते दहा हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल साठी मिळत आहेत.

2022 मध्ये ही तेजीत राहण्याची शक्यता
भारत आणि अमेरिकेत कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने पुरवठा कमी राहील. त्यामुळे कापूस बाजार 2022 मध्ये ही तेजीत राहण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात कापसाचे दर जवळपास 41 टक्क्यांनी वाढले आहेत. 2022 मध्ये जागतिक कापूस उत्पादन वाढीचा अंदाज असला तरी वापरही वाढला तसेच चीनची आयात वाढेल त्यामुळे कापूस बाजारात तेजीचा माहोल राहील असं अमेरिकेतील एका संस्थेने म्हटले आहे.

देशामध्ये कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडील कापूस कमी असण्याची शक्यता जिनिंग उद्योगांना व्यक्त केली आहे. तर व्यापाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील शेतकऱ्यांकडून 20 ते 25 टक्के कापूस शिल्लक असण्याचा अंदाज व्यापार्‍यांकडून व्यक्त केला जातोय. कापडाला स्थानिक आणि निर्यातीसाठी असलेली मागणी तसेच कापसाची वाढलेली निर्यात यामुळे देशांतर्गत कापूस बाजारात दर टिकून आहेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय कापूस आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरातील तफावत दूर होते त्यात मंगळवारी इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंज वर कापसाचे व्यवहार एकशे पंचवीस पॉईंट 380 झाले मागील काही दिवसात हे दर माघारी असले तरी टिकून आहेत.