Cotton Rate : सध्या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कारण की कापसाचे दर काही वाढायचे नाव घेत नाहीत. शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून देखील कापसाचे दर वाढले नाहीत. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला कापूस विक्रीसाठी काढला आहे. सध्या पेरणीचे दिवस चालू आहेत यामुळे शेतकऱ्यांना पैशाची कमी भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कापूस विकण्यास सुरवात केली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे कापसाला दर मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. यावर्षी कापूस लागवड देखील कमी झाली आहे. कापसाच्या दरामध्ये दररोज चढउतार झालेली पाहायला मिळत आहे. आज कापसाला किती बाजारभाव मिळाला याबद्दल जाणून घेऊया. (Cotton Rate)
सिरोंचा, पारशिवनी, मनवत, काटोल, सिंदी(सेलू) या बाजारमध्ये कापसाला ७००० रुपयांपर्यंत सर्वाधिक जास्त दर मिळाला आहे. मागच्या काही दिवसापासून कापसाला ७००० रुपयापर्यंतच दर मिळत आहे. मनवत बाजारामध्ये सर्वात जास्त कापसाची आवक झाली आहे.
शेतकरी मित्रांनो कापसाला किती भाव मिळतोय हे दररोजच्या दररोज तुम्हालाही चेक करायचा आहे का? मात्र कुठे चेक करावे हे समजत नाही तर मग काळजी नका करू, आम्ही तुमच्यासाठी Hello Krushi नावाचं एक अँप बनवल आहे. यामध्ये तुम्ही दररोजचा बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर हवामान अंदाज, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री आणि अन्य कृषी विषयक माहिती घेऊ शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.
शेतमाल : कापूस (Cotton Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
24/07/2023 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 350 | 6900 | 6900 | 6900 |
सिरोंचा | — | क्विंटल | 80 | 6700 | 7000 | 6800 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 240 | 6900 | 7125 | 7050 |
मनवत | लोकल | क्विंटल | 1400 | 6200 | 7385 | 7275 |
काटोल | लोकल | क्विंटल | 75 | 6700 | 7000 | 6800 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 130 | 7150 | 7200 | 7190 |