Cyclone In Maharashtra : तीव्र चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना आयएमडीचा इशारा!

Cyclone In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पावसाने थैमान (Cyclone In Maharashtra) घातले असताना, आता 23 ते 27 मे दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये एक चक्रीवादळ धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन, त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव ओडिशा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये दिसून येणार आहे. हे चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल, ज्यामुळे देशाच्या विस्तृत भागावर (Cyclone In Maharashtra) परिणाम होईल. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान (Cyclone In Maharashtra)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तुफान अवकाळी पाऊस (Cyclone In Maharashtra) पडत आहे. वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या या पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. अशामध्ये आता राज्यात आज देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता हवामान असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना अवकाळीचा इशारा

आज सोलापूर, कोल्हापूर, जालना, सिंधुदुर्ग, बुलडाणा, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम, अहमदनगर, सांगली, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Cyclone In Maharashtra) पडण्याची शक्यता असून, या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आला आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना तसेच शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करत असताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या चटक्यात घट

दरम्यान, मागील 24 तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर आहे. तर ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. अरबी समद्रात येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ज्यामुळे सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे.