हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या प्रामुख्याने दूध व्यवसाय (Dairy Farming) करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे. मात्र, अनेक जण माहितीअभावी दुग्ध व्यवसाय करताना एकाच प्रकारचा चारा जनावरांना खायला देत असतात. परिणामी त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होत असतो. अर्थात दुधाळ जनावरांना योग्य त्या प्रमाणात, योग्य तो चारा न दिल्याने दूध उत्पादनात घट दिसून येत असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण दुधाळ जनावरांना (Dairy Farming) संतुलित आहार कसा द्यावा? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
संतुलित आहार का महत्वाचा? (Dairy Farming In Maharashtra)
तुम्हालाही पशुपालन करून चांगले कमवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला दूध जनावरांना (Dairy Farming) चांगला चारा, त्यांचे राहणीमान अर्थात योग्य हवेशीर शेड आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. परंतु, या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधाळ जनावरांना संतुलित आहार (अॅनिमल फीड), ज्याच्या सेवनाने त्यांचा लवकर विकास होतो आणि त्याचबरोबर अनेक रोगांशी लढण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे पशुपालन व्यवसायात आर्थिक उन्नती साधण्यासाठी दुधाळ जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे असते.
दूध उत्पादनासह आरोग्य सुधारते
दुधाळ जनावरांना संतुलित आहार दिल्यास, त्याचे अनेक फायदे होतात. जनावरांच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होते. याशिवाय संतुलित आहारामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर शरीर आतून मजबूत होते. आजकाल पसरत असलेल्या प्राणघातक रोगांशी लढण्यास हा गाय, म्हैस सक्षम होते. संतुलित आहार दिल्यास, गाय किव्हा म्हैस दरवर्षी निरोगी वासराला जन्म देऊ शकते. प्राण्यांच्या संतुलित आहारात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. जसे की प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, खनिज-लवण आणि अनेक विशेष जीवनसत्त्वे ज्यांचे प्रमाण चांगले असते.
असा बनवा संतुलित आहार
शेतकरी घरच्या घरी दुधाळ जनावरांसाठी संतुलित आहार सहज बनवू शकतात. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. सर्वप्रथम तुम्हाला जनावरांच्या आहारात दररोज हिरवे चारा आणि कोरडा चारा समाविष्ट करावा लागेल. जो तुम्हाला शेतकऱ्यांना सहज उपलब्ध असतो. त्यानंतर शेतकरी सुमारे 25 ते 35 टक्के ढेप, 25 ते 35 टक्के भरडधान्य, 10 ते 30 टक्के भुसा किंवा कोंडा 2 टक्के सामान्य मीठ इत्यादी चांगले मिसळून खाद्य बनवू शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचे ऍनिमल फीड त्यात मिसळू शकतात. जेणेकरून त्याचा फायदा आणखी प्राण्यांना होईल. पण त्याचे प्रमाण जास्त नसावे. अर्थात या संतुलित आहारामुळे दुग्ध व्यवसायात तुमचा मोठा फायदा होणार आहे.