हॅलो कृषी ऑनलाईन : योग्य नियोजन, कामाची आवड असल्यास कोणताही व्यवसाय (Dairy Farming) यशस्वी करता येऊ शकतो. सध्याच्या काळात अनेक तरुण उद्योग आणि व्यवसायाकडे वळत आहेत. शेती आणि शेतीपुरक व्यवसांकडे अनेकांचा कल आहे. यात दुग्धव्यवसाय हा चांगला फायदा मिळवून देणारा आहे. दूध डेअरी किंवा दूध संकलन केंद्र सुरू करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. पुण्यातील दारुंब्रे येथील दूध डेअरी व्यावसायिक (Dairy Farming) संदीप सोरटे यांनी या व्यवसायात प्रगती साधली आहे.
महिन्याला 50 हजारांहून अधिकचा नफा (Dairy Farming In India)
हिंजवडीजवळच्या दारुंब्रे येथे 5 वर्षांपूर्वी संदीप सोरटे यांनी दूध व्यवसाय (Dairy Farming) सुरू केला. त्यापूर्वी ते दुसऱ्या एका डेअरीला दूध घालत होते. यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जवळपासच्या शेतकऱ्यांना भेटून दूध गोळा करण्यास सुरुवात केली. आता या व्यवसायातून महिन्याकाठी 50 हजारांहून अधिकचा नफा मिळत असल्याचे सोरटे सांगतात.
सोळाशे लिटर दुधाची खरेदी-विक्री
दूध डेअरी सुरू करण्यासाठी पहिल्यांदा फॅट मशीन, काटा, बोरकुलर आणि फ्रिज या वस्तू घ्याव्या लागतात. दूध संकलन जास्त असल्याने 8 लाख रुपयांपर्यंत खर्च आला. परंतु, छोट्या प्रमाणात हा व्यवसाय करण्यासाठी फ्रीज, चार कँड, फॅट मशीन घेऊन 2 लाख रुपये खर्चात व्यवसाय सुरू होऊ शकतो, असे सोरटे यांनी सांगितले. सुरुवातीला 100 ते दीडशे लिटर दूध होते. हळूहळू ते वाढत गेले. आता गाई व म्हैस धरून सोळाशे लिटर दूध खरेदी विक्री केली जाते. म्हशीच्या दुधाची फॅट ही साडेपाच ते दहा पर्यत बसते. 6.0 ते 9.0 फॅट असेल त्या दुधाचे दर हे 52 रुपये लिटर इतके आहे.
कसा मिळतो नफा?
दरम्यान, गाईच्या दुधासाठी 32 रुपये भाव दिला जातो. एका लिटर मागे 3 रुपयेचा नफा व्यवसायिकाला होत असतो. विक्री करणे त्याची ने आण करणे हा खर्च जातो. तरीही यातून 40 ते 50 हजार रुपये नफा मिळवता येतो, अशी माहिती शिव दूध डेअरीचे मालक संदीप सोरटे यांनी दिली. शेती आणि शेतीपुरक व्यवसांकडे अनेकांचा कल आहे. यात दुग्धव्यवसाय हा चांगला फायदा मिळवून देणारा आहे. त्यामुळे तुम्ही देखील या व्यवसायातून प्रगती साधू शकतात.