द्राक्ष बागेची खरड छाटणी करतायं ? शेतकऱ्यांनो ‘या’ गोष्टीवर लक्ष द्याच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषि ऑनलाईन : आता आर्लि द्राक्ष बागेच्या खरड छाटणी जवळच येत आहे काही सुरुवात पण झाली आहे.पुढील वर्षी भरघोस उत्कृष्ट गुणवत्तेचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन येण्यासाठी आजच काम करणे अनिवार्य आहे तरी द्राक्ष बागाईतदार बंधुनी खालील गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे.

1) बोधांची नांगरट / मुळी तोडणे हा प्रकार बंद करा –
कमीत कमी मशागत करा. खोल नांगरट,बोध तोडणे, असले प्रकार करू नका. यामध्ये जाड मुळी- १०/१४ mm ची तुटेल व अशी मुळी तयार होण्यासाठी वेलीला २/३ वर्षाचा कालावधी लागतो. ह्या मुळामध्ये सुद्धा खोडा प्रमाणे अन्न साठा होत असते.
वेलीने तयार केलेले अन्नसाठा, तसेच पुरवठा आपणच तोडून टाकतो तरी कृपया सावधान ! मुळी तोडू नका.जास्त मुळी तोडल्यास वेलीला शॉक पोहचतो व पुढील वर्षा साठी अपूर्ण अन्नसाठा व कमकुवत घड निर्मिती होते.

2)सुपरफॉस्फेट चा वापर वाढवा
५०% पेक्षा जास्त द्राक्ष बागाईतदार सुपरफॉस्फेट चा वापर करत नाही कारण सुपरफॉस्फेट मधील (p)फॉस्फरस हा जमिनीत फिक्स होतो व त्याचा उपयोग होत नाही असा समज गैरसमज सर्वांचा आहे . परंतु कुठले ही खते जमिनीत फिक्स होतात. व त्याच्यावर जमिनीतील सूक्ष्मजीवाणू द्वारे प्रक्रिया होऊन ते उपलब्ध स्वरुपात वेलीला पांढऱ्या मुळी द्वारे उचलता येतात. जरी जास्त PH व चुनखड जमिनीत सुद्धा सुपरफॉस्फेट द्या. कारण या मधील जिप्सम हा भूसुधारकराचे (Soil Reclaimation) काम करतो. तसेच पिकास P (पालाश), S (सल्फर) आणि Ca (कॅल्शियम) उपलब्ध होतो. तरी सिंगल सुपर फोस्फेट चा वापर हा चांगला घड निर्मिती साठी करा. तसेच आज सर्वच द्राक्ष वेली या अशक्त पिवळसर झालेल्या आहेत. वेली ताकदवान रसरसीत करण्यासाठी खोडातील व मुळीतील अन्नसाठा वाढवण्यासाठी ३०० ते ४०० किलो सुपरफोस्फेट शेणखता बरोबर मिसळून टाका

3)शेणखताचा वापर वाढवा

खरड छाटणी साठी १० ते १२ टन शेणखत एकरी द्या शेणखत ओले किवा सुके दोन्ही चालते फक्त ओल्या शेणखतावर सुपरफोस्फेट / DAP जास्त टाकावा लागेल. शेणखतामुळे जमिनीचे भोवतीक, रासायनिक व जैविक गुणधर्मात मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल तसेच सेंद्रिय कर्ब वाढेल.

4) चिपट / गवताची मल्चिंग करा –
मल्चिंग हा बागेचा एअर कुलर आहे मल्चिंग मुळे ४० ते ५०% पाण्याची बचत होते. गांडुळे,
सूक्ष्मजीवांसाठी खास जागा मल्चिंग मुळे उपलब्ध होते. मल्चिंग मुळे तुमच्या बागेचे ६०% समस्या
कमी होतात यामुळे मुळांची भरघोस वाढ होऊन वेल रसरसीत होते.

5) दोन गल्ली मध्ये डबल ड्रीप लाईन टाका –
सध्या आपण फक्त ३०% जमिनीचा व मुळींचा उपयोग करतो जवळ जवळ ७०% वेलीभोवतीचे जागे कडून आपण काम करवून घेत नाही, त्यामुळे वेली कमकुवत होत जातात व त्यांची उत्पादकता दिवसेंदिवस घटत आहे . वंरब्यावर क्षार एकवटलेले आहे. त्यासाठी दोन गल्ली मध्ये साध्या पेप्सी ड्रीप लाईन द्वारे पाणी पुरवठा केल्यास वेलीचा मुळीचा विस्तार (रूटझोन) वाढून वेल सशक्त होईल परंतु खरड छाटणी नंतर ३५ ते ७० दिवसांमध्ये पाण्याचा ताण द्यावा लागेल तरच काडीमध्ये चांगली गर्भधारणा व सूक्ष्म घड निर्मिती होईल. तसेच सबकेन केल्यानंतर बागेमध्ये मोकळे फल्डने पाणी देऊ नका. एकवेळ सबकेन च्या पुढील फुटी निघाल्या नाही तरी चालतील पण जास्तीचे पाणी नको.

6) वेलीचा जोम कमी करण्यासाठी –
• टील्ट – १० ते २० मिली – २ ते ३ वेळा फवारणी घ्या.
• ०.५२.३४ – ५०० ग्रम – ५ ते ६ वेळा फवारणी घ्या.
• ०.०.५० – ८०० ग्रम – ४ ते ५ वेळा फवारणी घ्या.
• पाण्याचा ताण द्याच.

7) संजीविकाचा वापर –
सबकेन केल्यानंतर
• युरॉसील – २५ ग्रम – २ वेळा फवारणी घ्या.
• 6 BA – २० ppm – २ ते ३ वेळा फवारणी घ्या.
• इथ्रेल – ५० मिली सबकेन च्या पुढील शेंडा टॉपिंग पूर्वी फवारणी घ्या.

8) सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी –
• झिंक – २०० ग्रम + बोरॉन – १०० ग्रम – २ ते ३ वेळा फवारणी घ्या.
• ची. कॅल्शियम – २०० ग्राम + ची. म्याग्नेशियम – २०० ग्रम – २ ते ४ वेळा फवारणी घ्या.
• मिक्स मायक्रोन्युट्रीयंट – २०० ग्रम + सिविड – २०० मिली फवारणी घ्या.
• ०.५२.३४ – ५०० ग्राम + ची. म्याग्नेशियम – २०० ग्रम फवारणी घ्या.

9) द्राक्ष बागेला एकरी लागणारे एकूण NPK किलो मध्ये
यानुसार सेंद्रिय व रासायनिक सोत्रांमधून दिल्या जाणाऱ्या अन्नद्रव्यांची विभागणी खालीलप्रमाणे करता येते.

N (नत्र) P (स्फुरद) K (पालाश)
२५० किलो ३५० किलो २५० किलो किलो / एकरी यापैकी
३०% ५०% ४० % एप्रील छाटणी साठी
७५ किलो १७५ किलो १५० किलो किलो एकरी डोस खरड छाटणी साठी घ्या.
३०किलो ८७.५ किलो ६० किलो सेंद्रिय पदार्थांमधून(४०%)
४० किलो ८७.५ किलो ९० किलो रासायनिक खतांमधून .

१०) वेलीवरील तानतणाव कमी करा –
१) जैविक रोग व किडीचा चोख बंदोबस्त करा.
२) अजैविक उन,वारा,पाऊस,दलदल,गारपीट या पासून बागेचे संरक्षण करा.
३) जास्त लोड मुळे वेली थकतात व जास्त विश्रांती हवी.