हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेतीबरोबरच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. भारतात औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीमधून चांगले उतपन्नही मिळते. आजच्या लेखात इसबगोल या औषधी वनस्पती विषयी जाणून घेणार आहोत. ही वनस्पती अशा वनस्पतींपैकी एक आहे ज्याचे उप्तादन भारतात होते पण ते परदेशात निर्यात केले जातात.
इसबगोलची120 कोटींची निर्यात
यामधून परकीय चलन तर मिळतेच पण जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण होते. इसबगोल ही सुद्धा अशीच वनस्पती आहे. एकट्या भारत देशामध्ये एकूण उत्पादनाच्या 80 टक्के उत्पादन होत आहे. औषधी पिकांच्या निर्यातीत इसबगोल प्रथम क्रमांकावर आहे. दरवर्षी इसबगोलची निर्यात ही 120 कोटी रुपयांची होते. या औषधी वनस्पतीचे इराण, इराक, अरब अमिराती, भारत आणि फिलिपाईन्स हे जगातील प्रमुख उत्पादक आहेत. भारतात गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर इसाबगोलची लागवड करतात.
प्रति क्विंटल 10,000 रुपये
–रबी हंगामात म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इसबगोलची लागवड केली जाते आणि मार्च महिन्यापर्यंत याला पीक लागते.
–त्याची झाडे हळूहळू वाढतात आणि हाताने ते काढून घेण्याचा सल्ला दिला जातो.
— एक वेळेस लागवड केल्यावर कमीत कमी एकरी 4 क्विंटल उत्पादन मिळते.
–सध्या एक क्विंटलचा दर 10, 000 रुपये आहे. एका हेक्टरमध्ये इसबगोलचे 15 क्विंटल बियाणे मिळते.
–याशिवाय हिवाळ्यात इसबगोलच्या किंमती वाढतात, ज्यामुळे उत्पन्न आणखी वाढते.
–इसबगोलच्या बियाण्यावर प्रक्रिया केली तर ती अधिक फायदेशीर ठरते.
–या प्रक्रियेनंतर इसबगोलच्या बियांपैकी सुमारे 30 टक्के बिया भुसा तयार करतात आणि हा इसबगोलचा सर्वात महागडा भाग मानला जातो.
–इसबगोलच्या लागवडीतून भुसा सोडल्यानंतर खली आणि गोली सारखी इतर उत्पादने सोडली जातात. जे दीड लाख रुपयांपर्यंत विकले जातात.
औषधी गुणधर्म
इसबगोलच्या भुसामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. इसबगोलमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉल अजिबात नसते. इसबगोल सर्व वयोगटातील नागरिक खाऊ शकतात.