हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विकास सहकारी सेवा संस्था अर्थात विविध सहकारी सोसायट्या संगणकीकृत (Farmers Facility) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार आता राज्यातील अनेक गावातील विकास सेवा संस्थांवर संगणकीकरण बसवण्यात आले आहे. यामुळे गावातील सेवा संस्थांमध्ये रजिस्टरवर चालणारे काम आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. तसेच इतर कामेही ऑनलाईन पद्धतीने व्यवहार सुरू झाले आहेत. या संस्था आता गावातच शेतकऱ्यांना 151 सेवा (Farmers Facility) पुरविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
सर्व सुविधा पुरवणार (Farmers Facility Development Services)
पूर्वी केवळ रासायनिक खते पुरवणाऱ्या गावपातळीवरील विकास सेवा संस्था आता नवीन रूपात समाजासमोर आल्या आहेत. वीज बिल भरणे, ऑनलाईन बँकेचे व्यवहार करणे याचबरोबर गावातील सभासदांसाठी उपयुक्त गरजेच्या सेवाही (Farmers Facility) या संस्था पुरवणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असणाऱ्या सेवा संस्था शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या संस्था गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा गावातच पूर्ण करतात.
आधुनिक उपकरणे दाखल
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध सेवा संस्थांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो. गेल्या दोन महिन्यांत प्रत्येक गावातील विकास सेवा संस्थेच्या कार्यालयात नवीन संगणक, प्रिंटर, इंटरनेट उपकरणे दाखल झाली आहेत. सहकारी सेवा संस्थांचे दप्तरही संगणीकृत झाले असून, त्या अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रत्येक गावातील सेवा संस्थांचा पारंपरिक लूक आता बदलला असून, त्या आधुनिक होत आहेत.
कर्जमाफीसाठी महत्वाचे योगदान
ग्रामीण भागात पूर्वीपासूनच सेवा संस्थांचे योगदान चांगले आहे. जेव्हा मित्रखताची शेतकऱ्यांना (Farmers Facility) गरज असे, तेव्हा सोसायटीत खत उपलब्ध व्हायचे. अलीकडच्या काळात सेवा संस्थेतून पीक कर्ज घेऊन शेतकरी रासायनिक खते, बी-बियाणे रोखीने घेऊ लागले. सेवा संस्थेतून शेती पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. जेव्हा जेव्हा कर्जमाफी झाली, तेव्हा सामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. सेवा संस्था शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या आधारस्तंभ आहेत.
अधिक चांगल्या ऑनलाईन सुविधा मिळणार
डिजिटल तंत्रज्ञानामुळे गावे जगाशी जोडली जात आहेत. अशावेळी विकास सेवा संस्थांकडून सभासद शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवा वरदान ठरणार आहेत. गावोगावच्या विकास सेवा संस्था सरकारच्या मदतीने संगणकीकृत झाल्या आहेत. पुढील काळात सामान्य सभासदांना गावच्या सेवा संस्थेतून अधिक चांगल्या आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहेत. सेवा संस्थेच्या सभासदांसाठी ही चांगली बाब असल्याची माहिती सेवा संस्थांच्या संचालकांकडून देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना होणार ‘हे’ फायदे
- वेळेची बचत
- सोयीस्कर सेवा
- पारदर्शक व्यवहार
- अधिक चांगल्या सुविधा
- सरकारच्या योजनांचा लाभ घेणे सोपे