खुशखबर ! राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार इफकोचा द्रवरुप नॅनो यूरीया

liquid nano uria
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘इफको’ या रासायनिक खत उद्योगातील संस्थेने विकसित केलेल्या द्रवरुप ‘नॅनो यूरियाच्या’ महाराष्ट्रातील खत वितरणाचा शुभारंभ आज कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. आजपासून या ‘ नॅनो युरिया ‘ खताचे वितरण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. दादा भुसे यांनी नॅनो यूरीया शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे.

नॅनो यूरीयाच्या महाराष्ट्राकडे येणाऱ्या ट्रकला कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हा सर्व कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला.यावेळी झालेल्या ऑनलाइन उदघाटन कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन करतांना कंपनीच्या या उत्पादनाचे मोठे कौतुक केले.
इफकोच्या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या कंपनीनं महाराष्ट्रात येण्यासाठीचे आमंत्रण कृषीमंत्र्यांनी दिले. नव्या स्वरूपातील हे ‘ द्रवरूप खत ‘ पारंपारिक यूरियापेक्षा स्वस्त आणि हाताळण्यास सुलभ असून त्यामुळे प्रदुषण रोखण्यासही मदत होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. या काळात नॅनो यूरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य यूरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. बॉटलमध्ये द्रवरुपात नॅनो यूरिया उपलब्ध झाल्यानं वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील नॅनो यूरियाचा वापर फायेदशीर ठरेल.