हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खतांचा वापर हा केवळ मानवी आरोग्यासाठी घातक नाही तर जमिनीसाठी आणि एकूणच पर्यावरणासाठी देखील रासायनिक खाते धोकादायक आहेत. त्यामुळे हल्ली शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. सरकार देखील जैविक शेतीला प्रोत्साहन देत आहे. या लेखात आपण पिकांना उपयुक्त अशा बीजामृत या द्रवरूप खताचे फायदे आणि बनवण्याची पद्धत याविषयी माहिती घेणार आहोत.
बियाणे पेरणी किंवा रोपे लावण्यापूर्वी बीज व रोप संस्कार द्वारे त्यांची उगवण क्षमता वाढवणे गरजेचे असते. या प्रक्रियेमुळे जमिनीतून पिकांना होणाऱ्या रोग संक्रमणाला सेंद्रिय पद्धतीने अटकाव करणे शक्य होते.
बिजामृतसाठी साहित्य
१)वीस लिटर पाणी
२) देशी गायीचे ताजे शेण एक किलो
३) एक लिटर गोमूत्र
४) एक लिटर दही
५) 50 ग्रॅम कळीचा चुना
६)हिंग 10 ग्रम
७) एक पिंप
८) उपलब्ध जिवाणूसंवर्धक ( ट्रायकोडर्मा ),संबंधित पिकाच्यामुळातील माती
बीजामृत कृती आणि वापर
१) वरील सर्व साहित्याचे मिश्रण करून पिंपातील पाण्यात टाकून चांगले ढवळावे. हे बीजामृत रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी काठीने चांगले ढवळून बियाण्यांच्या बीज संस्कारासाठी वापरावे.
२)पिकांचे व भाजीपाल्याचे बियाणे जमिनीवर किंवा गोणपाटावर पसरावे. त्यावर बीजामृत शिंपडावे व हाताने बी वरखाली करावे.बियांवर बिजामृताचे अस्तर चढेल. बी सावलीत सुकवून पेरावे.
३) लागवडीअगोदर भाजीपाल्यांची, फळझाडांची रोपे लावण्यापूर्वी त्याच्या मूळ्याबीजामृताच्या द्रावणात पाच मिनिटे बुडवून लागवड करावी. द्राक्ष किंवा डाळिंबाच्या हुंड्या बीजामृतातबुडवून लावाव्यात.