Farmers Success Story: मुरमाड जमिनीत केली वांग्याची शेती, पहिल्याच काढणीला झाली अर्ध्या खर्चाची वसूली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीतून भरघोस उत्पादन (Farmers Success Story) घ्यायचे असल्यास चांगली जमीन फार महत्त्वाची असते. किंबहुना माती (Agriculture Soil) हा शेतीचा पाया समजला जातो. परंतु प्रत्येक जमीन सुपीक असतेच असे नाही. नापीक किंवा मुरमाड जमिनीत (Barren Land) शेती करायचे असल्यास तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा लागतो. आज आपण अशा शेतकरी बंधुंची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी मुरमाड जमिनीत वांग्याची शेती (Brinjal Farming) करून पहिल्याच काढणीला चांगले उत्पादन मिळवले आहे (Farmers Success Story).

नाशिक (Nashik)जिल्ह्यातील कळवण (Kalwan) तालुक्यातील पाळे खुर्द येथील शेतकरी दिनेश (भावडू) पाटील आणि भरत पाटील असे या शेतकर्‍यांचे नाव आहे.

पिढ्यान् पिढ्या गायरानसाठी राखून ठेवलेल्या मुरमाड जमिनीवर पीक घेणे अवघड मानले जाते. मात्र या पाटील बंधुनी 1 हेक्टर 40 गुंठे जमिनीवर वांगे पिकाची लागवड (Brinjal Farming) केली आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने केलेल्या वांगे पिकाच्या लागवडीमुळे पहिल्याच खुड्याला दिनेश पाटील यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे (Farmers Success Story).

तंत्रशुद्ध पद्धतीने वांगे लागवड

दिनेश पाटील यांच्या शेतातील जमिनीचा पोत पूर्णता मृद व मुरमाड स्वरुपाचा असल्यामुळे, जमिनीत पाण्याचा निचरा त्वरित व्हायचा. पिकाला सतत ओलावा राहावा, यासाठी त्यांनी वांग्याच्या पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. 

दिनेश पाटील यांनी वांगे लागवडीसाठी ‘सुपर गौरव’ या जातीची निवड केली. नर्सरीमधून नऊ हजार वांगी रोपांची 22,500 किमतीने खरेदी केली. इतर खर्च शेणखत, मल्चिंग पेपर, ड्रिप नळी, असे सर्व मिळून 32,000 रुपये खर्च केला. 24 एप्रिल 2024 रोजी लागवड करून दीड महिन्यात पीक काढणीला आले. 

दरम्यान पाटील यांना पहिलाच खुडा हा 20 कॅरेट निघाला आणि एक कॅरेट 20 किलो क्षमतेचे असून, एक कॅरेट 700 रुपये किमतीचे आहे. पहिला खुडा एकूण किंमत 14 हजार रूपयांचा झाला. त्यामुळे पहिल्याच खुड्यात त्यांचा निम्मा खर्च वसूल झाला आहे. त्यांच्या या प्रयोगाबाबत अनेकांनी विचारपूस केली असून मुरमाड जमिनीवरील त्यांची शेती चर्चेत आली आहे (Farmers Success Story).

भाजीपाला पि‍काकडे केंद्रित (Vegetable Farming)

भरत पाटील म्हणजे की, दहा वर्षांपूर्वी पाळे खुर्दचे शेतकरी ऊस, मका, कांदा (Onion) अशा प्रकारची पिके घेत होते; पण आता भाजीपाला पि‍काकडे युवा शेतकरी वळल्याने आर्थिक प्रगती होताना दिसत आहे. तर शेतकरी दिनेश पाटील म्हणाले की, शेतीतील नवीन तंत्रज्ञान अवगत झाल्याने तसेच शेतमाल जागेवर खरेदी प्रक्रिया होत असल्याने पाळे खुर्दचा शेतकरी भाजीपाला (Farmers Success Story) पिकाकडे केंद्रित झाला आहे. 

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.