हॅलो कृषी ऑनलाईन: भाजीपाला पिकांची लागवड करताना सातत्य (Farmers Success Story) व कष्ट करण्याची तयारी असावी लागते. मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर शेतकरी लाखात नफा कमवू शकतो, हे सिद्ध केले आहे सांगली जिल्हा, कडेगाव तालुका, असद या गावच्या युवा शेतकर्याने.
रणजीत जाधव असे या शेतकर्याचे नाव (Farmers Success Story) असून त्याने टोमॅटो पिकाचे (Tomato Crop) एकरी 39 टन विक्रमी उत्पादन (Tomato Record Production) घेऊन तब्बल 15 लाख 60 हजार रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे. टोमॅटोचे दर (Tomato Rate) वाढल्याचा फायदा झाला आहे, असे युवा शेतकरी (Young Farmer) रणजित जाधव यांनी सांगीतले.
रणजित जाधव हे नेहमीच वेगवेगळी भाजीपाल्याची पिके (Vegetable Farming) घेत आहे. टोमॅटो, वांगी, सिमला मिरची अशी भाजीपाल्याची पिके नेहमी घेत आहेत. त्यांनी 5 मार्चला अथर्व जातीच्या टोमॅटो पिकाची एक एकर लागवड केली (Farmers Success Story).
यासाठी त्यांना 7 हजार 500 रूपयांचा मल्चिंग पेपर (Mulching Paper) वापरला. नागमोडी पद्धतीने रोपांची लागवड केली. लागवड करण्यापूर्वी त्याने शेताची योग्य मशागत करून एक एकराला सहा ट्रॉली शेणखत घातले होते.
ठिबक द्वारे रोपांना पाणी, खते (Fertigation) दिली जात आहेत. या ठिबकच्या माध्यमातून आळवणी खते, औषधे दिली जात आहेत. टोमॅटो पिकाचा प्लॉट एकदम भरात आल्यानंतर वेळोवेळी त्या पिकाला मिश्र पद्धतीचे लागवड डोस दिले. रोपांच्या लागवडीपासूनच वेगवेगळ्या औषध फवारण्या केल्या.
बांबूच्या काठीचा मांडव घालून टोमॅटोच्या रोपांची योग्य बांधणी करून घेतली. योग्य वेळी फवारण्या व खते दिल्यामुळे झाडावरील फळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. एका फळाचे वजन सरासरी 90 ते 100 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते (Farmers Success Story).
प्रत्येक तोड्याला पाच ते सात टन माल निघाला. एकरी सरासरी 39 टन उत्पादन (Tomato Production) घेतले असून त्यातून 15 लाख 60 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रोजगारी, खते, बी-बियाणे यांचा खर्च वजा जाता निव्वळ नफा 12 लाख रुपये (Farmers Success Story) झाल्याचे रणजित जाधव सांगतात.
शेतीबाबत नकारात्मक भूमिका बाजूला ठेवा
गेल्या तीन वर्षांपासून रणजित जाधव हा शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतामध्ये करत आहे. त्याला वांगी, ढब्बू मिरची या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळाला होता. त्यामुळे त्याने भाजीपाला पिकामध्ये सातत्य ठेवले. युवकांनी शेती क्षेत्रामध्ये नकारात्मक भूमिका बाजूला सोडून भाजीपाला पिकामध्ये सातत्य ठेवावे. निश्चित शेती फायदेशीर असून तुम्ही शेतीतून लाखो रूपयांचे उत्पन्न मिळवू शकता (Farmers Success Story), असे आवाहन युवा शेतकरी रणजित जाधव यांनी तरुणांना केले आहे.