Farmers Success Story: मराठवाड्याचा ‘हा’ शेतकरी रेशीम शेतीतून करतो महिना 1 लाख रुपये कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाड्यात मागील काही वर्षापासून शेतकरी (Farmers Success Story) कपाशी, तूर, बाजरी या पारंपरिक पिकांसोबतच आधुनिक शेती करताना दिसून येत आहे. आधुनिक बदलाच्या वाटेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या देवगाव या गावाने देखील आघाडी घेतली आहे (Farmers Success Story). 

मुख्यत: शेती या व्यवसायावर (Farming) अवलंबून असलेल्या अवघे बाराशे पंधराशे लोकसंख्येच्या या गावातील जवळपास 70% टक्के शेतकरी अलीकडच्या दोन वर्षांच्या काळात रेशीम शेतीकडे (Silk Farming) वळले आहेत. या गावापासून तासभराच्या अंतरावर जालना (Jalana) आणि बीड (Beed) हे मराठवाड्यातील रेशीमचे प्रसिद्ध बाजारपेठ (Silk Market) उपलब्ध असल्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीम शेती (Sericulture) करताना दिसत आहेत. असाच एक शेतकरी म्हणजे विजय साहेबराव ढगे (Vijay Dhage).

आपल्या वडिलोपार्जित मोसंबी फळबाग, कपाशी, तुरी पिकांना फाटा देत गावाच्या या प्रवाहात विजय ढगे यांनी देखील भाग घेतला. ज्यात गेल्या वर्षीच्या जुलै मध्ये शासकिय अनुदानातून (Government Subsidy) तीन एकर क्षेत्रांवर तुती लागवड (Mulberry Planting) केली. ठिबकचा वापर करत त्यासाठी सिंचनाची व्यवस्था केली. पुढे खाजगी बँकेच्या अर्थसहाय्येतून 23 बाय 70 फुटाचा शेड उभारला आणि विजयरावांचा रेशीम शेतीचा प्रवास सुरू झाला (Farmers Success Story).

गेल्या वर्षभरात तुती पाल्याचा (Mulberry Leaves) अंदाज बांधत सरासरी 100 – 150 अशा अनिपुंजच्या (रेशीम अळी) रेशीम बॅच ढगे यांनी घेतल्या आहे. यास  बाजारदर चांगला मिळाल्याने उत्पन्न देखील चांगले मिळाले. सध्या ढगे यांच्या या शेड मधील चौथ्या बॅचचे रेशीम कोष जमा करण्याचे काम सुरू असून 400 चॉकीच्या या बॅच मधून 2.50 ते 3 क्विंटल रेशीम कोष उत्पादन ढगे यांना अपेक्षित आहे. 

सध्याच्या 450 ते 500 बाजारभावानुसार उत्पादित रेशीम कोष विक्रीतून विजय यांना खर्च वजा जाता. 80 हजार ते 1 लाख रुपये निव्वळ नफा (Farmers Success Story) मिळणार आहे. 

विजय यांचे रेशीम शेतीचे व्यवस्थापन 

शेडच्या बाहेरून हवेद्वारे घातक कीटक येऊ नये यासाठी विजय यांनी शेडला तीन टप्प्यांची सुरक्षा केली आहे. ज्यात सुरुवातीला आतल्या बाजूने मच्छर दानी, पोत्यांच्या पडदा, शेडनेट आहे. या व्यतिरिक्त विजय पत्नी आणि मुलांसोबत रेशीम अळीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. ज्यामुळेच उत्पन्न चांगले मिळत असल्याचे (Farmers Success Story) ते अभिमानाने सांगतात. 

आषाढात उत्पन्न देणारी रेशीम शेती

आषाढ म्हणजे खरीप पिकांच्या खते व्यवस्थापनाचा, कीड नियंत्रण करण्याचा महिना. यात शेतकरी स्वत:कडील सर्व जमापुंजी खर्च करत शेती व्यवस्थापन करत असतो. ज्याच्या जोरावर अपेक्षित उत्पन्नाची हमी शेतकर्‍यांना असते. मात्र एवढं सर्व करूनही नैसर्गिक अडचणी, बाजारदर आदिच्या कचाट्यात शेतकरी सापडतो. अशा वेळी रेशीम शेती हा शेतकर्‍यांसाठी एक चांगला पर्याय आहे. अवघ्या महिनाभरात हाती पैसे येत असल्याने आर्थिक अडचणी येत नाही. तसेच काही नुकसान झाले तरी महिना भराचे होते (Farmers Success Story) त्यामुळे शेतकर्‍यांनी रेशीम शेतीकडे वळायला हवे असे विजय ढगे सांगतात.