शेतकऱ्यांनो काढणी केलेला शेतमाल सांभाळा, आजपासून तीन दिवस राज्यातील ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातल्या अनेक भागांमध्ये रब्बीच्या हरभरा आणि गहू काढण्याची तयारी सुरू आहे. मात्र कशातच अवकाळी पाऊस खोडा घालू शकतो. कारण हवामान खात्याने आज दिनांक सात ते दिनांक दहा पर्यंत राज्यातल्या विविध भागात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हा पाऊस हलक्‍या स्वरूपाचा असेल तर कोकणात ढगाळ वातावरण राहील अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.

हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 7 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाटी वादळ विजांच्या कडकडाटासह तुरळक किंवा काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगोलग आपली काढणीची कामं झाली असतील तर मळणीची काम करून आपले सुकवलेला शेतमाल हा व्यवस्थित साठवणूक करून ठेवणे गरजेचे आहे.

कधी कुठे बरसणार सरी?

7 मार्च
आज दिनांक 7 मार्च रोजी नंदुरबार, धुळे ,नाशिक ,औरंगाबाद आणि जळगाव या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे या भागात विज, गडगडाटासह पावसाची शक्‍यता आहे. शिवाय पालघर, ठाणे, पुणे आणि अहमदनगर या भागांमध्ये हलक्‍या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र या शहरांना कोणताही अलर्ट जारी केलेला नाहीये.

8-मार्च
दिनांक आठ मार्च रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे ,सातारा ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,जालना ,बुलढाणा ,परभणी, हिंगोली ,वाशिम ,अकोला ,अमरावती, यवतमाळ, वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली ,गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता आहे.

9मार्च
दिनांक 9 मार्च रोजी नंदुरबार,, धुळे ,नाशिक, जळगाव,, औरंगाबाद ,अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जालना ,बीड ,परभणी ,वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
,
10मार्च
तर दिनांक 10 मार्च रोजी बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ ,अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल तर जळगाव ,औरंगाबाद ,अहमदनगर, नाशिक ,पुणे ,सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग ,धुळे या भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.