हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या बाजारपेठेत लसणाची (Garlic Rate Today) आवक कमी झालेली असून बाजारभाव (Bajarbhav) चांगला मिळत आहे. मागील काही महिन्यापासून लसणाचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे लसूण उत्पादक शेतकर्यांना (Farmers) सध्या तरी अच्छे दिन आहेत. मात्र आज लसणाच्या कमीतकमी भावात भारी तफावत जाणवत असून ती 9000 ते 20,000 दरम्यान आहे. जाणून घेऊ या वेगवेगळ्या बाजारपेठेत लसणाचे बाजारभाव (Garlic Rate Today).
लसणाची सर्वात कमी आवक हिंगणा बाजार समितीत (Bajar Samiti) फक्त 1 क्विंटल झाली असून 20,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाले आहे.
सर्वाधिक आवक नागपूर बाजारपेठेत (Nagpur Bajar Samiti) 320 क्विंटल झाली असून सर्वसाधारण दर (Garlic Rate Today) 17,500 रुपये, कमीतकमी 10,000 रुपये तर जास्तीत जास्त 20,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे. नागपूर खालोखाल अकोल्यात लसणाची 255 क्विंटल आवक झालेली आहे.
लसणाला सर्वाधिक भाव पुणे आणि छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 23,000 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे.
वेगवेगळ्या बाजात समितीत लसणाचे भाव (Garlic Rate Today)
बाजार समिती आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
अकलुज 8 11000 17000 16000
अकोला 255 14000 20000 16000
छ. संभाजीनगर 57 9000 23000 16000
श्रीरामपूर 15 10000 17000 15000
सांगली 114 10000 20000 15000
पुणे 151 10000 23000 16500
पुणे-मोशी 62 13500 15000 14250
नागपूर 320 10000 20000 17500
हिंगणा 1 20000 20000 20000