Goat Breeds : सोनपरी जातीची शेळी पाळा; 10 शेळ्यांपासून वर्षाला होईल लाखोंची कमाई!

Goat Breeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह भारतात शेतीसोबतच फार पूर्वीपासून विविध जातींच्या माध्यमातून शेळीपालन (Goat Breeds) हा व्यवसाय केला जात आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने, शेळीपालन व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. शेळीपालन हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू होत असल्याने, अलीकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जाऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीच्या एका अनोख्या जातीबद्दल (Goat Breeds) जाणून घेणार आहोत.

पूरक व्यवसाय म्हणून ओळख (Goat Breeds For Farmers)

खरेतर शेळीला गरीबाची गाय म्हणून ओळखले जाते. शेळ्यांचे संगोपन शेतकऱ्यांसाठी विविध कारणांनी फायदेशीर ठरत आहे. शेळीला खूपच कमी आहार लागतो. परिणामी, शेळीपालन व्यवसायात खूपच कमी खर्च असतो. यामुळे शेळीपालन करण्याला अनेक शेतकरी विशेष पसंती देतात. ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गाई आणि म्हशी पालन सोबतच शेळीपालन हा व्यवसाय अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

बरारी, ब्लॅक बंगाल जातींचा संकर

भारतामध्ये प्रामुख्याने शेळीच्या अनेक जाती पाहायला मिळतात. मात्र, शेळीची सोनपरी ही जात (Goat Breeds) विशेष लोकप्रिय आहे. या जातीच्या शेळीपासून शेतकऱ्यांना एक निश्चित चांगली कमाई होते. शेळीपालन व्यवसायातील जाणकारांच्या माहितीनुसार, सोनपरी जातीची शेळी ही प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी पाळली जाते. ही शेळी बरारी आणि ब्लॅक बंगाल या दोन जातीचे संकर करून, नव्याने सोनपरी शेळी म्हणून विकसित करण्यात आली आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

सोनपरी शेळीचा रंग हा प्रामुख्याने तपकिरी असतो. पाठीवर डोक्यापासून शेपटीपर्यंत काळी रेष असते. हीच काळी रेष या जातीच्या शेळीची एक प्रकारे ओळख ठरवते. या जातीच्या शेळीची शिंगे मागे वाकलेली असतात. या जातीच्या शेळीची विशेषता म्हणजे ही शेळी बंदिस्त शेळीपालनात तसेच घराच्या अंगणात देखील पाळले जाऊ शकते. यासाठी कोणतीच विशेष तरतूद करावी लागत नाही. भारतीय हवामानात या शेळीची चांगली वाढ होते. अर्थात राज्यातील हवामान या जातीच्या शेळीला चांगले मानवते.

एका वेताला देते चार पिल्ले

सोनपरी जातीच्या शेळीची एक सर्वात मोठी विशेषतः म्हणजे एका वेतात ही शेळी चार पिलांना जन्म देऊ शकते. विशेष म्हणजे या जातीच्या बकऱ्याचे मांस हे चवीला खूपच उत्कृष्ट असल्याने, या जातीच्या मांसाला बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते. यामुळे या जातीचे शेळीपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या जातीच्या दहा शेळ्यांचे संगोपन केले तरी वार्षिक अडीच ते तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न, हे शेळीपालन व्यवसायातून सहज मिळते.