हॅलो कृषी ऑनलाईन : व्यवसायाचा कोणताही असो त्याचे व्यवस्थापन (Goat Farming) अचूक असणे खूप गरजेचे असते. व्यवसायामध्ये अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींचा बारकाईने नियोजन करून, खर्च कमी करता येतो व मिळणारा नफ्यात वाढ करता येते. अगदी हीच बाब शेळी पालन व्यवसायालाही लागू पडते. शेळीपालन व्यवसायामध्ये देखील अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली. तसेच काही पद्धती अवलंबल्या तर नक्कीच खर्च कमी होऊन, नफा वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीपालनामधील (Goat Farming) मुक्त व्यवस्थापन पद्धत, तिच्यामुळे खर्चात होणारी बचत आणि मिळणारा अधिकचा नफा याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय आहे मुक्त व्यवस्थापन पद्धती? (Goat Farming Techniques)
शेळीपालन (Goat Farming) करताना शेतकरी शेळ्यांची जोपासना ही नापीक जमिनीवर उगवलेले गवत किंवा गायरान,नैसर्गिक पडीक जमीन किंवा झाडपाला इत्यादींवर शेळ्यांची उपजीविका केली जाते. या पद्धतीमध्ये रानामधील झाडांची सावली तसेच नदी, नाल्याचे पाणी तसेच तळ्यातील पाण्याचा उपयोग केला जातो. व या पद्धतीमध्ये निवारा, शेळ्यांसाठी आवश्यक चारा वैरण, खुराक आणि पाण्याची व्यवस्था केली जात नाही. या सगळ्या आवश्यक गोष्टींसाठी संपूर्णपणे शेळ्या या निसर्गावर अवलंबून असतात. ही पद्धत कमी पावसाच्या किंवा उष्ण हवामान असलेल्या भागात खूप सोयीचे आहे.
मुक्त व्यवस्थापन पद्धतीत नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. आर्थिक दुर्बल घटकातील शेळी पालक पारंपारिक स्वतंत्र पशू व्यवस्थापन आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून या पद्धतीचा अवलंब करतात. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या 50 पासून ते 200 यादरम्यान असू शकते. एकूण भांडवली गुंतवणूक, शेळ्यांच्या देखरेखीसाठी लागणारे मजूर तसेच चारा व पाणी यावरील खर्च वाचतो. तसेच शेळ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने मुक्त व्यवस्थापन पद्धती फायदेशीर असून, शेळ्या फिरत असल्यामुळे त्यांच्या शरीराला देखील व्यायाम मिळतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांच्या खाण्याच्या बाबतीत असलेल्या आवडीनिवडी खूप चांगल्या पद्धतीने जोपासल्या जातात. मजुरांवरील खर्च देखील वाचतो.
मुक्त व्यवस्थापन पद्धतीचे हे आहेत काही तोटे
मुक्त व्यवस्थापन पद्धती मध्ये शेळ्या मोकळ्या कुरणावर चरायला जातात. त्यामुळे लेंडीखत वाया जाते व खताचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाही. दुसरा तोटा म्हणजेच शेळ्यांचे प्रजनन, आहार आणि दूध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. नवजात करडांचे शरीराची वाढ खुंटते व मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता होते. त्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून शेळीपालन करायचे असेल तर ही पद्धत फायद्याची नाही. परंतु, कमी प्रमाणात शेळीपालनासाठी ही पद्धत नक्कीच एक आर्थिक फायदा देणारी आहे.