कसे कराल कांदा पिकावरील अंथ्रेकनोज रोगाचे नियोजन ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अंथ्रेकनोजएक बुरशीजन्य रोग असून याचे सगळ्यात प्रथम नोंद खरीप कांदा पिकातझाली होती. हा रोग प्रामुख्याने आंध्र प्रदेश राज्यातील कांदा पिकावर सातत्याने आढळत आला आहे. आपल्याकडेसुद्धा मागील 1ते2 वर्षांपासून याचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. या लेखामध्ये आपण या रोगाविषयी माहिती घेऊ.

अंथ्रेकनोज रोगाची कारणे

–हा रोग प्रामुख्यानेपिकांच्या अवशेषांमधून जमिनीमध्ये आणि नंतर रोपाद्वारे किंवा कांदा द्वारे पसरतो.
–हा रोग प्रामुख्याने येणारा पाऊस किती तीव्रतेचा आहे त्याचे प्रमाण आणि पावसाचे वारंवार येणे यावर प्रामुख्याने अवलंबून असते.
–हा रोग प्रामुख्याने कांदा पिकावर जमिनीतून अटेक करतो.
–हवामानामध्ये जास्त प्रकारच्या आद्रता पंचवीस ते तीस सेंटीग्रेड तापमान असेल तेव्हा याचा प्रसार जास्त होतो.
–एकदा का या रोगाचा संसर्ग कांदा पिकावर झाला तर तो वाऱ्याच्या साहाय्याने, पावसासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो.
–खास करून ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये 78 ते 90 टक्के आर्द्रता असली आणि पाऊस सरासरी जर 35 मिलिमीटर प्रत्येक आठवड्यात असेल तर हा रोग जास्त प्रमाणात पसरतो.

अंथ्रेकनोज रोगाची कांदा पिकावरची लक्षणे

–या रोगाच्या सुरुवातीला कांद्याच्या पातीवर सफेद रंगाचे ठिपके दिसतात. कालांतराने ते हलक्या पिवळट ढगांमध्ये रूपांतरित होतात व पुढे पूर्ण पातीवर पसरतात.
–या रोगाची तीव्रता जर वाढली तर पिकाची मान लांब होण्याचे सुरुवात होते. नंतर कांद्याची पात वेडीवाकडी होते. यालाच आपण पीळ्या रोग या नावाने ओळखतो.
–पुढे कालांतराने कांद्याच्या पातीची मान वाकते आणि जमिनीलगत होते.
–नंतर ही बुरशी काळा रंगाचे होते व रिंगसारखे लक्षणे पातीवर दाखवते.
–सुरुवातीला लक्षणे प्रामुख्याने शेतामध्ये घेतले पाणी साचलेले असते तिथे किंवा ट्रिपल किंवा स्प्रिंकलर च्या जवळ दिसतात.नंतर ते हळूहळू पणे पूर्ण शेतात होतात.
–या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोपाची मुळे कमकुवत होतात व पिवळी पडतात. कंद पोसत नाही आणि काढणीनंतर कंद पाण्याचे प्रमाण जास्त वाढते.

अशा पद्धतीने करा अँथ्रॅकनोज रोगाचे एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन

–सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पीक घेताना पिकांची फेरपालट करावी. पिकांचे अवशेष जमिनीत ठेवून येते काढून टाकावीत.
–गादीवाफ्यावर नर्सरी तयार करावी किंवा रोपांची पुनर्लागवड करावी.
–सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या रोगाला प्रतिकारक असणारे जातींची लागवडीसाठी निवड करावी. जसे की भीमा श्वेता इत्यादी.
–बियाण्यास कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे.
–पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांनाकार्बन्दाझीम2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपे त्या द्रावणामध्ये 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
–बियाणे टाकल्यानंतर किंवा रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर तीन किंवा चार दिवसांनी ट्रायकोडर्मा एक किलो प्रति एकर या प्रमाणात पाटपाणी द्वारे ड्रेचिंग करावे.