हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात रब्बी हंगामातील महत्वाचे पीक म्हणून ज्वारी हे पीक प्राधान्याने घेतले जाते . राज्यातील बहुतेक भागात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. यंदा पाऊसही समाधानकारक झाला आहे. जणून घेऊयात ज्वारी पेरणी संबंधीच्या काही महत्वाच्या टिप्स
१) ज्वारीच्या पेरणीसाठी काळी किंवा दुमत जमीन असावी लागते.
२)पिकाच्या योग्य वाढीसाठी जमिनीची योग्य मशागत करून घ्या.
३)२५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर पर्यंत कोरडवाहू क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जाते.
४)ज्यांच्याकडे ओलिताची क्षेत्र आहे त्यांच्याकडे ३० ऑक्टोबर पेरणी केली तरी चालेल.
५)३० ऑक्टोबर नंतर म्हणजेच उशिरा पेरणी केल्यास खोड/मूर माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
६)पेरणीच्या योग्य वेळेचे पालन करणे महत्वाचे आहे याकरिता जवळच्या कृषी विभागाचा सल्ला आवश्य घ्यावा.
७) ज्वारीचे काही वाण : सी. एस. एच 15, सी. एस. एच 19, के व्ही. क्रांती , फुले यशोदा, सी एस व्ही 18,सीएसव्ही 22, सी एस व्ही 29
८)आंतरमशागत देखील महत्वाची आहे , पीक साधारणतः ४० दिवस ताणविरहित ठेवले तर आपल्याला हमखास चांगले उत्पादन मिळते.
९) कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी ५०:२५:२५ तसेच ओलितातील ज्वारीसाठी ८०:४०:४० एनपीके खतांची मात्रा द्यावी.
१०) ही पहिली खताची मात्रा पिकाला ४० दिवसानंतर द्यावी. दुसरी मात्रा पीक ६० दिवसाचे झाल्यानंतर द्यावी .