हॅलो कृषी ऑनलाईन : लागवडीला साेपी, वाहतुकीला साेपी, उत्पादनाला भरपूर, कमी भांडवलात येऊ शकणारी व टिकाऊ अशी दुधी भाेपळ्याची भाजी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच आवडते. या भाजीपासून तयार हाेणारे दुधी हलवा, टुटी फ्रूटीसारखे टिकाऊ पदार्थ हिचे औद्याेगिक महत्त्व अधाेरेखित करतात. या भाजीच्या सेवनाने हृदयविकार कमी हाेताे. दुधी भाेपळ्यामध्ये पाणी 92.6 टक्के, प्रथिने 1.4 टक्के, चरबी 0.1 टक्का, कार्बाेदके 5.3 टक्के, खनिज पदार्थ 0.6 टक्के, कॅल्शियम 0.01 टक्का, फॉस्फरस 0.3 टक्का, लाेह 0.7 मि.ग्रॅ प्रति 100 ग्रॅ आणि काही प्रमाणात अ व ब जीवनसत्त्व इत्यादी शरीरास पाेषक असणारे घटक आढळतात. म्हणून आहारात याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हवामान व जमीन
दुधी भाेपळ्याची लागवड प्रामुख्याने खरीप व उन्हाळी हंगामात करतात. या पिकास उष्ण व दमट हवामान मानवते. थंडीत हे पीक टिकाव धरू शकत नाही. पाण्याचा चांगला निचरा हाेणाऱ्या हलकी ते मध्यम काळ्या जमिनीत या पिकाची लागवड करणे फायदेशीर ठरते. उन्हाळी हंगामात हे पीक भारी कसदार जमिनीतही घेता येते. रेताड जमिनीत खरीप हंगामातील लागवड फायदेशीर ठरते. सुत्रकृमी आणि मर राेगाचे जंतू असणाऱ्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये.
पूर्वशागत आणि लागवड
जमिनीची मध्यम खाेल नांगरट करावी व जमीन तापू द्यावी, कुळवाच्या आडव्या उभ्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीच्या मशागतीच्यावेळी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे. सूत्रकृमींचा प्राद्रुर्भाव टाळण्यासाठी निंबाेळी पेंड हेक्टरी 1800 ते 2000 किलाे पीक लावण्याअगाेदर जमिनीत मिसळावी. पिकात झेंडू लावल्यामुळेसुद्धा सूत्रकृमींचा बंदाेबस्त हाेताे. दुधी भाेपळ्यासाठी हलक्या जमिनीमध्ये 2.5 मी. आणि भारी जमिनीमध्ये 3.0 मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमिनीच्या उतारानुसार 5 ते 6 मी. अंतरावर पाणी देण्यासाठी आडवे पाट टाकावेत. सरीच्या एका बाजूस एक-एक मीटर अंतरावर आळे तयार करून प्रत्येक आळ्यात दाेन ते 3 ओंजळी कुजलेले शेणखत आणि थाेडी निंबाेळी पेंड टाकावी. लागवडीपूर्वी आळ्यामध्ये हेक्टरी 50 किलाे नत्र, 50 किलाे स्ुरद व 50 किलाे पालाश प्रमाणात टाकून शेणखत मातीमध्ये चांगले मिसळावे. प्रत्येक आळ्यात 2 ते 3 बिया थाेडेसे अंतर ठेवून टाेकाव्यात आणि नंतर पाणी द्यावे.
पेरणीपूर्वी बी रात्रभर काेट पाण्यात भिजवून घेतल्यास उगवण चांगली हाेते. बियांना प्रतिकिलाे 3 ग्रॅ थायरम चाेळावे. हेक्टरी 2 ते 2.5 किलाे बियाणे पुरेसे हाेते. खरीप हंगामातील लागवड मे-जूनमध्ये, तर उन्हाळी हंगामातील लागवड जानेवारी ेब्रुवारी महिन्यात करावी.
सुधारित जाती
सम्राट : भाेपळ्याचा हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून निवड पद्धतीने विकसित करून प्रसारित केलेला आहे. या जातीची फळे दंडगाेलाकार असून फळांची लांबी 30 ते 40 सें.मी. असते. फळांचा रंग हिरवा असून त्यावर बारीक लव असते, फळे बाॅक्स पॅकिंग व वाहतुकीसाठी साेयीस्कर आहेत. फळांचा ताेडा लागवडीनंतर 60 दिवसांनी सुरू हाेताे. वेलींचे आयुष्यमान सरासरी 150 ते 160 दिवसांचे असते. लागवड जमिनीवर तसेच मंडपावर वेल पसरून करता येते. प्रतिहेक्टरी 400 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
पुसा नवीन : ही लवकर येणारी जात असून या जातीच्या फळांची लांबी 25 ते 30 सेीं. आणि व्यास 5 ते 6 सेीं. असताे. सरासरी वजन 700 ते 900 ग्रॅपर्यंत असते. या जातीचे हेक्टरी 150 ते 170 क्विंटल उत्पन्न मिळते.
अर्का बहार : भारतीय उद्यानविद्या संशाेधन केंद्र, बंगलाेर येथून ही जात प्रसारित केलेली आहे. फळांचे सरासरी वजन 1 किलाे असून रंग िफकट हिरवा असताे. हेक्टरी सरासरी 400 ते 500 क्विंटल उत्पादन मिळते.
पुसा समर प्राॅलिफिक लाँग (सीएसपीएल) : या जातीच्या फळांचा रंग पिवळसर किंवा हिरवा असताे. या जातीची काेवळी फळे 40 ते 50 सें.मी. लांबीची आणि 20 ते 25 सें.मी. जाडीची असतात. या जातीपासून हेक्टरी 110 ते 120 क्विंटल उत्पादन मिळते.
पुसा मेघदूत : हा संकरित वाण असून फळे लांब व िफकट हिरव्या रंगाची असतात. हेक्टरी 300 क्विंटल उत्पादन मिळते.
खत व्यवस्थापन आणि आंतरमशागत
दुधी भाेपळ्याचे पीक मंडपावर घेतले तर 4 ते 5 महिने ताेडे चालूच राहतात. त्या दृष्टीने खताच्या मात्रा देणे गरजेचे असते. संपूर्ण पिकाच्या कालावधीत 200 किलाे नत्र 100 किलाे स्ुरद आणि 100 किलाे पालाश प्रतिहेक्टरी दिल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते. त्यासाठी लागवडीपूर्वी 50 किलाे नत्र, 50 किलाे स्ुरद आणि 50 किलाे पालाश द्यावा. लागवडीनंतर 15 दिवसांनी 50 किलाे नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. राहिलेला हप्ता लागवडीनंतर 60 दिवसांनी म्हणजेच फळांचा ताेडा सुरू झाल्यानंतर 100 किलाे नत्र, 50 किलाे स्ुरद आणि 50 किलाे पालाश या प्रमाणात द्यावा.
लागवडीनंतर एक ते दीड महिन्यात वेल मंडपावर पाेचल्यानंतर मूळच्या सऱ्या माेडून वेल वरंब्यावर घ्यावेत. त्याचवेळी नत्राचा वरील हप्ता द्यावा. दर दाेन पाण्याच्या पाळीनंतर जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
पाणी व्यवस्थापन
पिकास खरीप हंगामात गरजेनुसार पाणी द्यावे. लागवडीस 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. उन्हाळी पिकास 6 ते 7 दिवसांनी पाणी द्यावे. पाणी अगदीच कमी असल्यास केवळ सऱ्यांध्ये पाणी द्यावे. वेल वरंब्यावर घेतल्यानंतर दाेन वरंब्यांच्या माेकळ्या जागेत पाणी द्यावे.
वेलींना आधार व मंडपउभारणी
दुधी भाेपळ्याचे पीक मांडवावर चढविणे गरजेचे असल्याने वेलींना आधार देणे गरजेचे आणि ायद्याचे आहे. मंडपावरील भाेपळ्याच्या उत्पादनात जमिनीवर घेतलेल्या भाेपळ्यापेक्षा उत्पादनात जमिनीवर घेतलेल्या भाेपळ्यापेक्षा अडीच ते तीनपट वाढ हाेत असल्याचे प्रयाेगाअंती सिद्ध झाले आहे. याशिवाय फळांचा एकसारखा आकार, त्यावरील बारीक लव आणि सुलभ फवारणी यामुळे मंडप पद्धत उपयाेगी ठरते. दुधी भाेपळा मंडपावर घ्यायचा असेल तर सम्राट किंवा त्यासारख्या दंडगाेल आकाराच्या जाती लावाव्यात. ार लांब किंवा गाेल आकाराच्या जाती मंडपावर घेऊ नयेत.
भाेपळ्यासाठी मंडपउभारणी करावयाची असल्यास त्याची लागवड 3 x 1 मी. अंतरावर करावी. त्यासाठी वर सांगितल्याप्रम ाणे 3 मी. अंतरावर समांतर सऱ्या पाडाव्यात व प्रत्येक सरीवर 1 मी अंतरावर आळे करून लागवड करावी. सऱ्यांवर साधारणत: 5 ते 6 मी अंतरावर आडवे पाट टाकावेत. मंडपाची उभारणी करताना शेताच्या सर्व बाजूची प्रत्येक म्हणजे 3 मी अंतरावर 2.40 ते 2.70 मी. उंचीचे आणि 10 सें.मी. जाडीचे लाकडी डांब शेताच्या बाहेरील बाजूस झुकतील अशा पद्धतीने 60 सें.मी. जमिनीत गाडावेत. डांब गाडण्यापूर्वी जमिनीकडच्या भागाला डांबर लावावे म्हणजे डांब कुजणार नाहीत. प्रत्येक डांबाच्या बाहेरील बाजूने याेग्य जाडीच्या तारेने ताण द्यावेत. त्यासाठी याेग्य आकाराच्या दगडास दुहेरी तार बांधून ताे दगड 60 सें.मी. जमिनीत आडवा पक्का गाडावा. नंतर डांब बाहेरील बाजूस ओढून साधारणत: 2 मी. उंचीवर ताणाच्या तारेने पक्का करावा. तेथे तार खाली घसरू नये म्हणून तारेवर खिळा ठाेकून वरच्या बाजूने वाकवून द्यावा व तार पक्की करावी.
अशा रितीने डांबाला ताण दिल्यानंतर 10 गेजची दुहेरी तार पीळ देऊन व चारही दिशेला लाेखंडी पुलरच्या साहाय्याने व्यवस्थित ताणून घ्यावी. तसेच चारही बाजूने समाेरासमाेरील लाकडी डांब एकमेकांना 10 गेजच्या तारेने जाेडून घ्यावेत आणि पुलरच्या साहाय्याने ताण द्यावा. नंतर 45 सें.मी. अंतरावर 16 गेज जाडीची तार आडवी उभी पसरावी. जमिनीपासून 1.95 मी उंचीवरील वेलाला बांबूचा किंवा शेवरीचा आधार द्यावा, म्हणजे मांडवास झाेळ येणार नाही, तसेच वाऱ्याने मंडप हलणार नाही. मंडपउभारणीचे काम वेल साधारणत: 30 ते 45 सेीं. उंचीचे हाेण्याअगाेदर पूर्ण हाेणे गरजेचे आहे. मंडप तयार झाल्यानंतर 1.95 ते 2.10 मी लांबीची सुतळी घेऊन तिचे एक टाेक ज्या वेलीला बांबूचा आधार नाही त्या वेलीच्या तारेस व दुसरे टाेक वेलाच्या खाेडाजवळ तिरपी काडी राेवून त्या काडीस बांधावे व वेल त्या सुतळीस पीळ देऊन तारेवर चढवावा. वेल वाढत असताना बगलुट व तणावे काढावे. वेल 1.5 मी. उंचीचा झाल्यानंतर बगलुट व तणावे काढणे थांबवावे. मुख्य वेल मंडपावर पाेचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा व राखलेली बगलुट वाढू द्यावी.
संजीवकांचा वापर
दुधी भाेपळ्याच्या प्रत्येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फुले येतात. यांपैकी फक्त मादी फुलांनाच फलधारणा हाेते. संजीवकांचा उपयाेग करून मादी फुलांचे प्रमाण वाढवून अधिक फलधारणा मिळविता येते. यासाठी माॅलिक हायड्राझाइड (एम एच) 50 ते 100 पीपीएम आणि नॅफथॅलीन अॅसिटीक अॅसिड (एनएए) 100 पीपीएम ही संजीवके फारच उपयुक्त म्हणून सिद्ध झाली आहेत. संजीवकांचा पहिला फवारा वेल दाेन पानांवर असताना व दुसरा त्यानंतर सुारे एक आठवड्याने द्यावा, त्यामुळे भरीव वाढ हाेते.
पीक संरक्षण
दुधी भाेपळ्यावर मावा, फळमाशी या किडी व केवडा आणि भुरी यांसारखे राेग येतात.
कीड
मावा : ही कीड पानां धून रस शाेषण करते. त्यामुळे पाने आकसतात. किडीच्या विष्ठेतून गाेडसर द्रव पानांवर पसरताे त्यामुळे पानांचे प्रकाशसंश्लेषणाचे कार्य थंडावते. त्यासाठी डायमेथाेएट 30 ईसी 15 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
फळमाशी : ही माशी काेवळ्या फळांवर अंडी घालते, अंड्यांतून बाहेर आलेली अळी फळातील गर खाते. त्यासाठी मॅलॅथिऑन 50 ईसी 20 मिली+200 ग्रॅ गूळ प्रति 10 लिटर पाण्यात एकत्र करून सायंकाळच्या वेळेत फवारावे.
तांबडे भुंगेरे : लहान झाडावर ही कीड आढळून येते. तांबड्या नारंगी रंगाचे हे किडे असतात. यांच्या नियंत्रणासाठी पीक उगवल्यानंतर प्रादुर्भाव दिसून येताच डायक्लाेराेहाॅस 76 टक्के प्रवाही 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारणी करावी. त्यानंतर 5 टक्के निंबाेळी अर्काची फवारणी करावी.
राेग
केवडा (डाऊनी मिल्ड्यू) : प्रादुर्भाव झालेल्या वेलीची पाने लहान राहतात व त्यावर हिरवे पिवळे पट्टे दिसतात. राेगट पाने करपून गळून पडतात. त्यासाठी काॅपर ऑक्सिक्लाेराइड 25 ग्रॅ किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅ किंवा अॅझक्झाेस्ट्राॅबिन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
भुरी : या राेगाची सुरुवात प्रथम जुन्या पानांपासून हाेते. पानाच्या दाेन्ही पृष्ठभागावर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. राेगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास या बुरशीमुळे पाने भुरकट पडतात. हा राेग देठ, खाेड आणि फळांवरही पसरताे यामुळे वेलींची वाढ खुंटते. यासाठी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅ किंवा हेक्झाॅकाेनॅझाेल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
करपा : राेगाची लक्षणे दिसताच मॅन्काेझेब 25 ग्रॅ किंवा काॅपर ऑक्झिक्लाेराइड किंवा टेब्युकाेनॅझाेल 10 मिली 25 ग्रॅ 10 लिटर पाण्यातून फवारावे.
फळांची ताेडणी आणि पॅकिंग
फळांची ताेडणी फळे काेवळी असतानाच करावी, ताेडणी शक्यताे दिवसाआड करावी. ताेडणीच्या वेळी फळ प्लॅस्टिकच्या पिशवीत घालावे व नंतर अलगद फळ ताेडावे. फळ ताेडताना काेणतीही इजा हाेणार नाही याची काळजी घ्यावी. ताेडलेली चांगली फळे पुठ्ठ्याच्या खाेक्यात घालून पॅकिंग करावी व बाजारपेठेत पाठवावीत. दुधी भाेपळ्याचे सरासरी उत्पन्न 40 ते 50 टन हेक्टरी मिळते.