पुढील 3 तासांत ‘या’ तीन जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा

Weather Report
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । मागील काही दिवसांपासून राज्यात वदली वारे अन अवकाळी पावसाची रिमझिम सुरु आहे. रोज साधारण संध्याकाळी येणाऱ्या पाऊसामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. रविवारी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेतही महाराष्ट्रातील काही भागात वादळी वारे अन मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने आज वर्तवली आहे.

सॅटेलाइटवरील ताज्या निरीक्षणावरून मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडाच्या काही भागात गडगडाटीचे ढग आढळले आहेत.
या भागात पुढील ३ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे अन पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशी माहिती के. एस. होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

दरम्यान, पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांतील काही भागांत ३० ते ४० कि.मी. प्रति तास वेगाने वादळ वारे व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बाहेर जाताना खबरदारी घ्या. तसेच कोणत्याही मोठ्या झाडांजवळ उभे राहू नका अशी खबरदारीचा सूचना देण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो हे पण वाचा –

उसाला पाणी देण्याची शेतकऱ्याची अनोखी शक्कल…होते वेळ, वीज आणि पाण्याची बचत

महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सून दाखल; पुढचे 3 दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

#Fact Check पीक चांगले येण्यासाठी पिकांवर फवारली देशी दारू… मात्र हा देशी जुगाड कितपत योग्य? पहा काय सांगतायत तज्ज्ञ

रेशन दुकानदाराची तक्रार करा एका क्लिक वर; मेरा राशन वर मिळणार माहिती

७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!