राज्याच्या तापमानात वाढ ; मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता

heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढतो आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या किमान तापमानात घट झाली आहे. तर दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर येत्या तीन चार दिवस राज्यातील प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या नागपूर विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वायव्येकडील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील चार पाच दिवसांमध्ये मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात तीन ते पाच डिग्री सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.दरम्यान आज दिनांक 15 रोजी पुण्यातील माळीन येथे किमान10.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.