हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामातील एकमात्र पिक हे सद्धया वावरात उभे आहे आणि ते पिक म्हणजे तुरीचे पिक. यावर्षी खरीप हंगामातील बऱ्याचशा पिकांवर अतिवृष्टीमुळे रोगांचा प्रादुर्भाव हा दिसला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हि घट घडून आली आहे.
वातावरणातील बदलामुळे कीड आणि शेंगाना हानी पोहचवणाऱ्या अळ्या तसेच त्यापासून होणाऱ्या रोगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जेणेकरून खरीप हंगामातील इतर पिकांच्या उत्पादनाची भरपाई हि या पिकाच्या उत्पादनातून पूर्ण करता येईल. मात्र, यासाठी तूर पिकावर आलेल्या कीडीचे व्यवस्थापन करणे हाच एकमात्र पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या पिकावर आलेल्या किडीवर वेळीच नियंत्रण मिळवायला पाहिजे. यासाठी कृषी विद्यापीठाणे सांगितलेल्या सूचनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ह्या संकटाला सामोरे जाण्यासाठी कृषी विभागाने एक यंत्रणा तयार केली आहे, जर शेतकऱ्यांनी त्यानुसार उपाययोजना केल्या तर नक्कीच तुरीच्या उत्पादनात हि लक्षणीय वाढ होऊ शकते आणि जे उत्पादन कमी मिळणार होते ते अधिक मिळेल आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा हा मिळेल.
शेतकऱ्यांना दिल्या ह्या सूचना
शेतकरी मित्रांनो कृषी विद्यापीठाणे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही विशेष सूचना दिल्या आहेत त्या सूचना खालीलप्रमाणे:
–तुरीची ज्या पानांवर अळींचे संक्रमण आहेत अशी पाने गोळा करून अळ्यांसह नष्ट करावे.
–तूर पिकातून वेळोवेळी निंदनी करून तण काढून टाकावे म्हणजे हवा हि खेळती राहील शिवाय त्यामुळे दुसरे रोग पिकावर येणार नाहीत.
–तुरीचे पिक हे फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना प्रति एकर 2 कामगंद जाळी एक फूट उंचीवर लावावी.
–शेतकरी मित्रांनो शेतात एकरी 20 ते 30 ठिकाणी एक ते दोन फूट उंचीवर बर्ड स्टॉपची स्थापना करावी. यामुळे पक्ष्यांना अळ्यांची शिकार करता येईल.
–फुलोरा सुरू होताच, 25 ml 5% निंबोळी अर्क किंवा Azadirachtin 300 ppm प्रति 5 लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात.
–दुसरी फवारणी हि जेव्हा शेंगा खाणाऱ्या अळ्या ह्या पहिल्या अवस्थेत असतील तेव्हा करावी. शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी हि संध्याकाळी करावी असा सल्ला दिला जातो.
संदर्भ : कृषी जागरण