हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवस राज्यातल्या सर्वच भागात कमी अधिक फरकाने पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. रब्बीतील हरभरा, कांदा या पिकांसह फळबागांना देखील या पावसाचा आणि सध्या असलेल्या ढगाळ हवामानाचा फटका बसतो आहे. सध्याच्या हवामानामुळे हरभरा पिकावर कोणता परिणाम होतो आहे आणि त्यावर काय उपाय करावेत याची माहिती कृषी तज्ञ डॉ.डी.डी.पटाईत (कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी) यांनी दिली आहे जाणून घेऊया…
हरभरा पिकावर काय होय परिणाम ?
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच रोप अवस्थेत हरभ-यामध्ये रोप कुरतडणा-या अळीचा देखील काही ठिकाणी प्रादुर्भाव होऊ शकतो.
काय करावेत उपाय ?
1)घाटेअळी करीता
–शेतामध्ये इंग्रजी ” T ” आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत.
–घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर
इमामेक्टिन बेंझोएट ५ % – ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८८ ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २० % – ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १२५ ग्रॅम फवारावे.
2)जमिनीलगत रोपे कुरतडणारी अळी करीता
क्लोरपायरीफॉस २० % – २० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर ४०० मिली खोडाभोवती आळवणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००