सोलापुरात कांद्याची उलटी पट्टी ; कांदा विकून व्यापाऱ्यालाच दिले शेतकऱ्याने 567 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा पिकाचा भाव कमी झाला आहे. अशातही बदलते वातावरण पाहता शेतकरी काहीतरी हातात मिळेल या आशेने शेतात कांदा विक्रीस बाजारसमितीत नेतो आहे. मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 943 किलो कांदा निव्वळ 1 रुपये किलो दराने विकावा लागला. विकूनही शेतकऱ्याला काहीच हाती लागले नाही उलट शेतकऱ्यालाच 567 रुपये देणे म्हणून त्याच्या हातात पावती पडली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

कांदा विकून उलट व्यापाऱ्यालाच दिले शेतकऱ्याने 567 रुपयेोलापुरात कांद्याची उलटी पट्टी

सोलापूर जिल्ह्यातील वरकटणे येथील शेतकरी परमेश्वर जाधव यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 943 किलो कांदा विकला. त्यांनी हा कांदा 1 रुपये किलो तर कांही कांदा 50 पैसे प्रतिकिलो दराने विकला, यातून त्यांच्या हाती 809 रुपये बिल प्राप्त झाले.मोटारभाडे,हमाल,तोलाई आणि इतर मिळून 1376 रुपये खर्च आला.त्यामुळे उलट 567 देणे म्हणून शेतकऱ्याच्या हातात पट्टी पडली.

त्यामुळे कांदा शेतातच पडून राहिला असता तर निदान एवढा तोटा तरी झाला नसता अशी भावना शेतकऱ्यांची झालीय.राज्यात अचानक बदलेल्या मोसमामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळतं नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्याने दोन महिने घाम गाळून त्याचा कांदा बाजारात नेला होता आणि त्याचा लिलाव अत्यंत कमी किमतीत झाला.

काढायला आलेल्या डाळिंबातून 70 लाख मिळणार होते; पण अवकाळी पाऊस आला अन्...

त्यात वर्षानुवर्ष त्या शेतकऱ्यांच्या जीवावर जगणारे हे आडते त्यांचा खर्च का घेण्याचे टाळत नाहीत? मुळात ज्याने घाम गाळायचा त्याला कात्रजचा घाट हे व्यापारी दाखवतात आणि स्वतःची मात्र पूर्णपणे पैसे काढून घेतात म्हणजे शेतकऱ्याने जे कष्ट केले, त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांना मिळाले आहेत. हे यातून सरळ दिसते, म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे जेणेकरून ही मधली नफेखोरी कमी होईल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.