Kanya Van Samrudhhi Yojana: पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीसाठी, महाराष्ट्र शासनाची ‘कन्या वन समृद्धी योजना’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पर्यावरण, वृक्ष लागवड (Kanya Van Samrudhhi Yojana) आणि संवर्धनाबाबत सध्याच्या आणि भावी पिढीत आवड निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने कन्या वन समृद्धी योजना (Kanya Van Samrudhhi Yojana) सुरू केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकरी कुटुंबात (Farmer Family) मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दांपत्याला शासनाच्या (Government) वतीने दहा वृक्षांची रोपे लागवडीसाठी विनामूल्य दिली जाणार आहेत. ज्यामध्ये पाच सागाची तर पाच फळझाडाची रोपे प्रोत्साहनपर दिली जाणार आहेत.

वन क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली आणणे हे या योजनेचे (Kanya Van Samrudhhi Yojana) उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजनेचे उद्दिष्ट (Kanya Van Samrudhhi Yojana)

  • शेतकरी (Farmer) कुटुंबांना पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे, त्याबरोबर वृक्ष लागवडीतून भविष्यात होणारे उत्पन्न मुलीच्या भविष्यासाठी खर्च करण्यात येईल हे निश्चित करणे
  • महिलांचे सशक्तीकरण (Empowerment Of Women) आणि सबळीकरण करणे
  • राज्यामध्ये सध्याचे 20 टक्के असलेले वनक्षेत्र वन विभागाच्या (Forest Department) अंतर्गत 33 टक्के पर्यंत वाढविणे
  • भावी पिढीसाठी सुरक्षित पर्यावरणाचा निर्माण करणे तसेच भावी पिढीमध्ये वृक्षांप्रति आवड निर्माण करणे

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मुलीचा जन्माचा दाखला
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • ७/१२ उतारा
  • शेतामध्ये रोप लावल्याचे पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना अंमलबजावणी प्रक्रिया (Kanya Van Samrudhhi Yojana)

  • शेतकरी पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत (Grampanchayat) मध्ये जाऊन मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत मध्ये जाऊन विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा,
  • मुलगी झालेल्या शेतकरी दांपत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणार्‍या पहिल्या पावसाळ्यात दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत 10 वृक्ष लावण्याची संमती विहित नमुन्यातील अर्जात दर्शवावी.
  • अर्जामध्ये मुलीचे संपूर्ण नाव, पालकाचे संपूर्ण नाव, संपर्कासाठी संपूर्ण पत्ता व आधार कार्ड क्रमांक इत्यादीचा उल्लेख करावा.
  • मुलीच्या जन्मानंतर येणार्‍या पहिल्या पावसाळ्यापूर्वी 10 खड्डे खोदून तयार ठेवावे.
  • जवळच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटिकेतून 10 रोपे विनामूल्य ग्रामपंचायती मार्फत दिली जातील, त्यामध्ये 5 रोपे सागाची, 2 रोपे आंबा, 1 फणस, 1 जांभूळ आणि एक चिंच इत्यादी भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असेल
  • शेतकऱ्याने 10 वृक्षांची लागवड (Tree Plantation) पूर्ण केल्यावर, लागवड केलेल्या जागेचा तपशील आणि लागवड केलेल्या रोपांचे फोटो शेतकऱ्याने संबंधित ग्रामपंचायतीमध्ये जमा करणे आवश्यक असेल. ही सर्व माहिती ग्रामपंचायतव्दारे एकत्रित करून तालुका स्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांना दरवर्षी 31 जुलै पर्यंत पाठविली जाईल.
  • योजनेंतर्गत लागवड केलेल्या झाडांची निगा, संरक्षण, संगोपन आणि झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण उच्च राहावे याकरिता शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला सामाजिक विभागामार्फत देण्यात येईल.
  • संबंधित शेतकर्‍यांनी दरवर्षी दि. 31 मे रोजी वृक्ष जिवंत असल्याच्या प्रमाणाबाबत ग्रामपंचायतीस माहिती द्यावी लागेल
  • ही योजना शेतकर्‍यांच्या कुटुंबांमध्ये जास्तीत जास्त दोन मुली जन्माला येतील आणि त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल व त्यांच्या पुरतीच मर्यादित असेल. म्हणजे 1 मुलगा किंवा 1 मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

या योजनेचा (Kanya Van Samrudhhi Yojana) लाभ मिळवण्यासाठी आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायती मध्ये जाऊन अर्ज करू शकता.