Kharif Production : देशात अन्नधान्याचे उत्पादन किती होणार? वाचा… सरकारचे पीकनिहाय उत्पादनाचे उद्दीष्ट!

Kharif Production In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अन्नधान्य उत्पादनाचे (Kharif Production) उद्दिष्ट ठरवले आहे. सरकारने 2024-25 या पीक वर्षासाठी 340.40 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये खरीप हंगामातील 159.97 दशलक्ष टन, रब्बी हंगामातील 164 दशलक्ष टन आणि इतर हंगामातील 16.43 दशलक्ष टन उत्पादनाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सरकारकडून पीकनिहाय उद्दीष्ट किती ठेवण्यात आले आहे. याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

तांदूळ, गहू उत्पादनाचे उद्दिष्ट (Kharif Production In India)

भारत सरकारने 2024-25 या पीक वर्षासाठी 340.40 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे (Kharif Production) उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारी माहितीनुसार, तांदळाचे एकूण उत्पादन 136.3 दशलक्ष टन, गहू 115 दशलक्ष टन, डाळीचे 29.90 दशलक्ष टन, तेलबियांचे 44.75 दशलक्ष टन आणि धान्यांसह भरडधान्यांचे उत्पादन 2.95 दशलक्ष टन इतके निश्चित करण्यात आले आहे. कडधान्यांमध्ये 4.50 दशलक्ष टन, उडीद 3.05 दशलक्ष टन, मूग 4.25 दशलक्ष टन, हरभरा 13.65 दशलक्ष टन आणि मसूर पिकाचे 1.65 दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर खरिपातून 9.5 दशलक्ष टन आणि रब्बीतून 18.15 दशलक्ष टन कडधान्ये खरेदी करण्याचे सरकारने नियोजन केले आहे.

मिलेट्स उत्पादनाची आकडेवारी

मिळालेल्या माहितीनुसार, मक्याचे उत्पादन 38.85 दशलक्ष टन आणि बार्लीचे 2.25 दशलक्ष टन इतके निर्धारित करण्यात आले आहे. या दोन्ही पिकांमध्ये भरड धान्याचा समावेश होतो. दुसरीकडे, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि इतर बाजरीसह श्रीअण्णा उत्पादनाचे लक्ष्य 18.10 दशलक्ष टन आहे, त्यापैकी 14.37 दशलक्ष टन खरीप हंगामासाठी उद्दिष्ट आहे. तर रब्बीसाठी 2.6 दशलक्ष टन आहे. तर कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट 35 दशलक्ष गाठींचे आहे.

तेलबियांचे किती उत्पादन करण्याचे उद्दीष्ट?

तुरीच्या डाळीचे 4.50 दशलक्ष टन, उडीद 3.05 दशलक्ष टन, मूग 4.25 दशलक्ष टन, हरभरा 13.65 दशलक्ष टन आणि मसूर पिकाचे 1.65 दशलक्ष टन उत्पादनाचे (Kharif Production) उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरिपातून 9.5 दशलक्ष टन आणि रब्बीतून 18.15 दशलक्ष टन कडधान्ये खरेदी करण्याचे सरकारने नियोजन केले आहे. याशिवाय खरीप हंगामात 28.37 दशलक्ष टन आणि रब्बी हंगामात 15.03 दशलक्ष टन र इतर हंगामात 1.35 दशलक्ष टन तेलबियांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे.

तेलबियांमध्ये, मोहरीचे (रब्बी पीक) उत्पादन 13.8 दशलक्ष टन, भुईमूग 10.65 दशलक्ष टन, सोयाबीन 15.8 दशलक्ष टन असे सरकारचे लक्ष्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट 170 किलोच्या 35 दशलक्ष गाठी ठेवण्यात आलं आहे. तर 470 दशलक्ष टन उसाचे उत्पादन करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.