हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील अनेक क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र आहे. आजच्या लेखात आपण भुईमुगातील पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण याची माहिती घेऊया...
पाणी व्यवस्थापन
खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस)., आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. भुईमूग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी(आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.
पीक सरंक्षण
फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी १० मिली किंवा ८ मिली, डिमॅटोन १५ टक्के प्रवाही औषध १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २० इ.सी ४ मिली किंवा डेकामेथ्रीन २८ इ.सीय १० मिली किंवा किनॉसफॉस २५ इ.सी. २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.