जाणून घ्या गव्हाच्या बंपर जाती; तांबेरा, करपाला करतात फाईट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :रब्बी हंगाम तोंडावर आहे. अशात भारतीय गहू अनुसंधान संस्थानच्या कृषी वैज्ञानिकांनी गव्हाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. या जातींची लागवड केल्याने तसेच त्यांच्या व्यावसायिक वापराने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. या जाती रोग प्रतिबंधक असून पोषण मूल्यांनी परिपुर्ण आहेत.

डी डब्ल्यू आर ने गव्हाच्या या तीन जाती म्हणजे डीबीडब्ल्यू- 296,डीबीडब्ल्यू- 327 आणि डीबीडब्ल्यू 332 या तीन प्रकारच्या जाती रिलीज केले आहेत.
प्रामुख्याने या तीनही जाती हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश ह्या राज्यांसाठी उत्पादन आणि पोषक तत्वांचा बाबतीत चांगल्या मानल्या गेले आहेत. तसेच पर्वतीय भाग, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर साठी सुद्धा या जातींचे परिणाम चांगले आले आहेत.

हरियाणा येथील करणाल जिल्ह्यामध्ये असलेल्या गहू अनुसंधान संस्थान मध्ये विकसित केलेल्या या तीनही गव्हाच्याजातींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या तांबेरा आणि करपा सारख्या रोगांना सहसा बळी पडत नाहीत.या जातींची रोगप्रतिकारक क्षमता फारच उत्तम असल्याने शेतकऱ्यांना गव्हावर पडणाऱ्या रोगांवर जो खर्च करावा लागतो त्या होणाऱ्या खर्चा पासून बचत होणार आहे.