हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी लिंबू लागवडीकडे (Lemon Farming) वळत आहेत. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्याचे दर नेहमीच गगनाला भिडलेले असतात. प्रामुख्याने भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक लिंबू 10 रुपयांना विकला जातो. त्यामुळे लिंबू शेतीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा हा देखील मोठ्या प्रमाणात असतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण देशातील प्रमुख पाच लिंबू उत्पादक राज्य कोणती? या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? आणि एकूणच प्रमुख पाच राज्यांमध्ये एकूण किती लिंबू उत्पादन (Lemon Farming) होते? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
आंध्रप्रदेश प्रथम स्थानी (Lemon Farming In India)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांसह लिंबू सरबताला मोठी मागणी असते. याशिवाय स्वयंपाकघरात देखील लिंबाला नेहमीच (Lemon Farming) मोठी मागणी असते. त्यामुळे लिंबाला बाजारात नेहमीच चांगला दर मिळतो. देशातील एकूण लिंबू उत्पादनापैकी आंध्रप्रदेश या राज्यात सर्वाधिक लिंबू उत्पादन होते. आंध्रप्रदेशातील शेतकरी देशाच्या एकूण लिंबू उत्पादनापैकी 19.73 टक्के लिंबू उत्पादन घेतात.
महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा
याशिवाय लिंबाचा उपयोग हा सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये किंवा हॉटेलमध्ये सर्वच खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. देशातील लिंबू उत्पादनात गुजरात हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणी देशातील एकूण लिंबू उत्पादनापैकी (Lemon Farming) 17.80 टक्के इतके उत्पादन होते. दरम्यान, देशातील एकूण लिंबू उत्पादनात आघाडीच्या कृषी उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा लागतो. महाराष्ट्रात देशातील एकूण लिंबू उत्पादनापैकी 9.85 टक्के उत्पादन घेतले जाते.
पाच राज्यांमध्ये 70 टक्के उत्पादन
दरम्यान, लिंबापासून लोणचे बनवले जाते. परिणामी त्यासाठी देखील लिंबाला बाजारात मोठी मागणी असते. देशात लिंबू उत्पादन कर्नाटक हे चौथ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणचे शेतकरी देशातील एकूण लिंबू उत्पादनापैकी जवळपास 9.68 लिंबू उत्पादन घेतात. तर 8.61 टक्के उत्पादनासह मध्य प्रदेश हे राज्य लिंबू उत्पादनात देशात पाचव्या स्थानी आहे. दरम्यान, वरील पाच राज्यांमध्ये देशातील एकूण लिंबू उत्पादनापैकी विक्रमी 70 टक्के उत्पादन होते. तर उर्वरित 30 टक्के लिंबू उत्पादन हे अन्य राज्यांमध्ये होते.