Lemon Market Rate : अखेर लिंबू दर नरमले; गोणीमागे 400 ते 500 रुपयांनी घट!

Lemon Market Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात (Lemon Market Rate) घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे लिंबाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस आणली आहेत. दरात लिंबांच्या गोणीमागे 400 ते 500 रुपयांनी घट झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसामुळे लिंबांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांनी लिंबांची (Lemon Market Rate) मोठ्या प्रमाणावर तोड सुरू केली आहे.

बाजारात आवक वाढली (Lemon Market Rate)

अवकाळी पाऊस, तसेच हवामान बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. आठवड्यापूर्वी तेजीत असलेल्या लिंबांच्या दरात (Lemon Market Rate) घट झाली आहे. घाऊक बाजारात सध्या प्रतवारीनुसार लिंबांच्या एका गोणीला 300 ते 1300 रुपये दर मिळत आहेत, अशी माहिती एका व्यापाऱ्याने दिली आहे. मार्केट यार्ड घाऊक बाजारात सध्या दररोज दीड ते दोन हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. आठवड्यापूर्वी किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री पाच ते दहा रुपयांना करण्यात येत होती. आवक वाढल्याने लिंबांच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात घट झाली आहे.

हैदराबाद, चेन्नईहून लिंबांची आवक

सध्या बाजारात विक्रीस पाठविण्यात येणारी लिंबे आकाराने लहान आणि हिरवी आहेत. लिंबांची प्रतवारी फारशी चांगली नसल्याने दरही कमी मिळाले आहेत. उन्हाळ्यात आंबट लिंबांना चांगले दर मिळतात. राज्यात प्रमुख बाजारात सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकरी लिंबे विक्रीस पाठवितात. त्याचबरोबर हैदराबाद, चेन्नई परिसरातील शेतकऱ्यांनी ही महाराष्ट्रातील बाजारात लिंबे मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविली आहेत.

कच्च्या लिंबांच्या मागणीत घट

अवकाळी पावसामुळे लिंबूचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लिंबे विक्रीस पाठविली आहेत. हवामान बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. बाजारात आवक झालेली लिंबे कच्ची आणि रंगाने हिरवी आहेत. कच्च्या लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. 15 किलो लिंबांचे दर प्रतवारीनुसार 300 ते 1300 रुपयांपर्यंत आहेत. लिंबांच्या गोणीच्या दरात 400 ते 500 रुपयांनी घट झाली आहे. असे एका लिंबू व्यापाऱ्याने सांगितले आहे.