Leopard Attack : नादखुळा..! बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला; …एका ठोशात बिबट्या छूमंतर!

Leopard Attack On Farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात सध्या शेती करताना शेतकऱ्यांना अनेक वन्य प्राण्यांचा (Leopard Attack) मोठा त्रास सहन करावा लागतो. हरीण, नीलगाय, रानडुककर माकडे असे काही वन्य प्राणी हे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. तर साप, विंचू असे काही वन्य प्राणी हे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी काम करताना इजा पोहचवत असतात. प्रसंगी शेतकऱ्यांचा मृत्यू देखील ओढवतो. तर हल्ली राज्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि नाशिक जिल्ह्यातील निफाड या भागांमध्ये बिबट्याचे शेतकऱ्यांवरील हल्ले (Leopard Attack) देखील वाढले आहे.

बिबट्याशी दिला जिकरीने लढा (Leopard Attack On Farmer)

राज्यात गेल्या काही काळात शेतामध्ये काम करताना बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला (Leopard Attack) केल्याच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे अशा घटनांमध्ये अनेक शेतकरी प्रसंगावधान राखत, कुशतेने बालम-बाल बचावले आहेत. अशातच आता एका शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची एक घटना समोर आली असून, या शेतकऱ्याने देखील हल्ला केलेल्या बिबट्यासोबत जिकरीने लढा देत स्वतःचा जीव वाचवला आहे.

कुठे घडली घटना?

उत्तराखंड या राज्यातील नैनिताल जवळ असलेल्या पेरुमदरा भागातील भवानीपूर येथे ही घटना घडली आहे. भवानीपूर येथील शेतकरी दारा सिंग (वय 46) हे संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास, आपल्या शेतातून काम करून घरी परतत होते. मात्र, घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असताना, वाटेवर पुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. ज्यामुळे अचानक बिबट्याने हल्ला चढवल्याने शेतकरी दारा सिंग खाली कोसळले.

शेतकरी रुग्णालयात दाखल

ते खाली कोसळल्याने बिबट्याने त्यांच्या उजव्या हाताला चावा घेतला. मात्र, हे सर्व घडत असताना शेतकरी दारा सिंग यांनी स्वतःला सावरत बिबट्यासोबत लढा देणे सुरु केले. त्यांनी बिबट्याच्या जबड्यावर जोरात ठोसा मारला. त्यांनी मारलेला ठोसा इतका जोरात होता की, त्यामुळे बिबट्या घाबरून पळून गेला. त्यांनतर दारा सिंह यांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती कुटुंबियांना सांगितली. कुटुंबातील व्यक्तींनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. दारा सिंह यांच्या उजव्या हातावर बिबट्याच्या चाव्याच्या खुणा आणि मानेवर नखांच्या खुणा आहेत. दरम्यान, घटनास्थळी गस्त वाढवण्यात आल्याची माहिती स्थानिक वन विभागाने दिली असून, हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसविण्याची कारवाई सुरू आहे. असे सांगण्यात आले आहे.