ठंडा ठंडा , कूल कूल…! राज्यात थंडी वाढण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा अठरा अंशांच्या खाली आलाय. पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असल्याने थंडीत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहेत. आज दिनांक आठ रोजी राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुण्यात पारा कमीत कमी 13.3 अंशांवर
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक आठ रोजी सकाळी पुण्यात शिरूर येथे 13.3 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वातावरणात गारठा आणि धुके वाढले आहे. तसेच बारामती इथं 15.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

जवाद चक्रीवादळ निवडल्यानंतर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रात ही महाराष्ट्र लगतच्या समुद्रसपाटीपासून 1.5 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून विदर्भ मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात कोकणात काही ठिकाणी तापमानाचा पारा 30 अंशांच्या वर गेला आहे. यातच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानातही हळूहळू घट होऊ लागली आहे मंगळवारी दिनांक सात रोजी मालेगाव येथे नीचांकी 13.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरीत उच्चांकी 33.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.