मराठवाड्यात पुन्हा शेतीपिकाचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून अति पाऊस बरसतोय. बुधवारी 22 तारखेच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद जालना बीड व हिंगोली जिल्ह्यातील सत्र मंडलामध्ये अतिवृष्टीची झाली. या पावसामुळे शेतीपिकांची पुन्हा दैना झाली आहे. नुकसानीच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील 19 मंडळांमध्ये अति पाऊस झाला. इतर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाऊस सुरू होतात. औरंगाबाद जिल्ह्यातील सहा, जालना जिल्ह्यातील आठ, बीड मधील दोन व हिंगोली जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

–औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी 34.2 मिलिमीटर
–जालना जिल्ह्यात 36.6
–बीड जिल्ह्यात 23.9
–लातूर जिल्ह्यात 13.3
–नांदेडमध्ये 12.2
–परभणीत 16.4
–हिंगोली 10.9
–उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी सरासरी 1.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात संपूर्ण पावसाळ्यात सरासरीत 679 . ५ मिलिमीटर पाऊस पडतो तर जून पासून आतापर्यंत अपेक्षीत सरासरी 635.2 मिलिमीटर च्या तुलनेत 859 . ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अपेक्षित पावसाच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात 143 ते जालना 165. ५, बीड 156 . १, लातूर 115 . ७, उस्मानाबाद 117.7 टक्के, नांदेड 131. 9, नांदेड 132 . ४ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी 121. 1 टक्के पाऊस झाला. काढणीला आलेल्या सोयाबीन सह विविध पिकांच्या मुळांवर हा पाऊस पडल्याचे चित्र दिसत आहे.