Maharashtra Monsoon Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार; जाणून घ्या राज्यातील विविध धरणातील पाणीसाठा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये (Maharashtra Monsoon Update) पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागातर्फे (IMD) सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच पुणे (घाटमाथा), विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.

राज्यामध्ये (Maharashtra Monsoon Update) पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert Of Monsoon) दिला आहे.

कोकणातील (Konkan Monsoon Update) रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, तर विदर्भातील (Vidarbha Monsoon Update) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे.

नगर, नाशिक मराठवाड्यातील जालना, परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा (Maharashtra Monsoon Update) ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) आहे.

कोकण आणि विदर्भामध्ये (Maharashtra Monsoon Update) आज (20 जुलै) पावसाचा जोर अधिक असणार आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ आहे, तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, नाशिक, धुळे आणि जळगाव, संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. तर सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे (Maharashtra Monsoon Update).

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरामध्ये (Bay Of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनची (Monsoon) आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, गुणा, मंडला, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत तो पट्टा सक्रिय आहे. तसेच महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणार्‍या परस्पर विरोधी वाऱ्यांना जोडणारे क्षेत्र देखील सक्रिय आहे (Maharashtra Monsoon Update).

राज्यातील धरणसाठा स्थिती (Dam Water Level)

राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Rain) हजेरी लावली असून आता धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे. अनेक धरणामध्ये 40 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा (Dam Storage) असून काही धरणे अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. लोणावळामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 135 मिमी पावसाची नोंद झाली. ताम्हणी घाटात 168 मिमी, तर डुंगुरवाडीमध्ये 133 मिमी पाऊस झाला. धरण क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस होत आहे. कोयनामध्ये 114 मिमी, राधानगरी 163 मिमी, कासारी 105 मिमी, पाटगाव 300 मिमी पावसाची नोंद झाली.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात 72 हजार 286 क्युसेकने पाणी जमा होत आहे. धरणामध्ये 99.32 टीएमसी पाणीसाठा झाला असून 81 टक्के धरण भरले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चार धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, प्रमुख राधानगरी 68, वारणा 66, तर दूधगंगा 52 टक्के भरले आहे

नीरा नदीच्या खोऱ्यात येणार्‍या वीर, भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी, या चार धरणांतील पाणीसाठा 44.56 टक्के म्हणजे 19.601 टीएमसी इतका आहे.