हॅलो कृषी ऑनलाईन : महिंद्रा कंपनीचे जिओ सिरीजमधील ट्रॅक्टर (Mahindra Tractors) देशभरातील शेतकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. विशेष म्हणजे हे ट्रॅक्टर उत्कृष्ट मायलेजसह हेवी ड्युटी वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्हीही शेती किंवा व्यावसायिक कारणांसाठी उत्कृष्ट कार्यक्षमतेच्या एखाद्या ट्रॅक्टरची खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी महिंद्रा जिओ 225 डीआय 4 डब्लूडी एनटी हा ट्रॅक्टर (Mahindra Tractors) सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.
‘महिंद्रा जिओ 225 डीआय 4 डब्लूडी एनटी’ट्रॅक्टरबद्दल (Mahindra Tractors For Farmers)
महिंद्रा जिओ 225 डीआय 4 डब्लूडी एनटी ट्रॅक्टरमध्ये (Mahindra Tractors) तुम्हाला 2300 सीसी क्षमतेसह 2 सिलिंडर देण्यात आले आहेत. याशिवाय या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला वॉटर कूल्ड इंजिन पाहायला मिळते. जे 20 एचपी पॉवरसह 66.5 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या या छोट्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ड्राय टाइप एअर फिल्टर पाहायला मिळतो.ज्याची कमाल पीटीओ पॉवर 18 एचपी इतकी आहे. कंपनीच्या या मिनी ट्रॅक्टरचे इंजिन 2300 आरपीएमची निर्मिती करते. जिवो सिरीजच्या या मिनी ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता 750 किलो आहे. या छोट्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 22 लिटर क्षमतेची इंधन टाकी पाहायला मिळते. कंपनीच्या या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 25 किमी प्रति तास इतकी देण्यात आली आहे आणि तो 10.2 किमी प्रति इतक्या रिव्हर्स स्पीडसह उपलब्ध आहे.
काय आहेत ‘या’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?
महिंद्रा जिओ 225 डीआय 4 डब्लूडी एनटी ट्रॅक्टरला कंपनीने पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे. याशिवाय या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 4 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्स दिला आहे. या महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये एकच क्लच असून, तो स्लाइडिंग मेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह येतो. कंपनीचा हा ट्रॅक्टर ऑइल इमर्जड ब्रेकसह उपलब्ध आहे. महिंद्राचा हा ट्रॅक्टर मल्टी स्पीड टाईप पॉवर टेकअपसह येतो. जो 605, 750 आरपीएमची निर्मिती करतो.
महिंद्रा कंपनीचा हा ट्रॅक्टर 4WD म्हणजेच चार चाकी चालवणारा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. ज्यास पुढील बाजूस 5.20 x 14 आकारात तर मागील बाजूस 8.30 x 24 आकारात टायर देण्यात आलेले आहे. महिंद्राच्या या मिनी ट्रॅक्टरद्वारे तुम्ही रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, एमबी नांगर आणि रिव्हर्स फॉरवर्ड रोटरी टिलर यासह अनेक कृषी उपकरणे चालवू शकतात.
किती आहे किंमत?
महिंद्रा कंपनीने आपल्या ‘महिंद्रा जिओ 225 डीआय 4 डब्लूडी एनटी ट्रॅक्टर’ची एक्स-शोरूम किंमत देशभरात 4.60 लाख ते 4.75 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. विविध राज्यांमध्ये आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्स वेगवेगळा असल्याने, या ट्रॅक्टरची किंमत विविध राज्यांमध्ये वेगवेगळी असू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ५ वर्षांची वॉरंटी दिलेली आहे.