हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात ऊस पिकाचे क्षेत्र मोठे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का ? मॉरीशिमध्ये घेतला जाणारा काळा ऊस देखील महाराष्ट्रात लागवड केला जातो. वाशीम शहरापासून ५ किलोमीटरवर काटा नावाचं गाव या काळया मॉरीशियस उसाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. आता हा ऊस इथे कसा काय घेतला जातो ? जाणून घेऊया…
मॉरीशस च्या काळया उसाची जिथे लागवड केली जाते तिथे पूस आणि काटेपुर्णा नदीचा संगम आहे. य संगमाजवळ काटा हे गाव वसलेले आहे. उसाच्या लागवडीशिवाय हे गाव पुरातन बाबींकरिता देखील प्रसिद्ध आहे. जवळपास १८ व्या शतकामध्ये मुंबईचे शिल्पकार अशी ख्याती मिळवलेले जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांनी मॉरिशस येथून भारतात येताना सोबत काळ्या उसाचे वाण आपल्यासोबत आणले होते. त्याची लागवड काटा येथे केली. कालांतराने हेच वाण काटा गावातल्या त्यावेळच्या शेतकऱ्यांनी मिळवून शेती करायला सुरुवात केली आणि म्हणूनच या उसाला मॉरीशियस ऊस असे देखील म्हंटले जाते. सध्याचा विचार करता काटा गावात आजही शेकडो एकर क्षेत्रावर शेतकरी काळ्या उसाची शेती करतात. हा ऊस आरोग्यासाठी लाभदायक तर आहेच शिवाय या ऊसाला महाराष्ट्र राज्यासह शेजारील मध्यप्रदेश, तेलंगणा व गुजरात या राज्यातही मागणी आहे. पूस आणि काटेपुर्णा नदीच्या पाण्याने आणि सुपीक जमिनीत काळ्या उसाची लागवड करून इथला कष्टकरी शेतकरी समृद्ध झाला आहे.