अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस आयातीसाठी हालचाली ; देशातील कापूस बाजार होणार का प्रभावित ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कापसाच्या बाजारभावमध्ये मोठी तेजी आहे. शेतकऱ्यांना कापसासाठी सध्या नऊ हजार पाचशे ते दहा हजार 300 रुपयांपर्यंत कमाल भाव मिळत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. शिवाय कापसाला मागणी जास्त आहे आणि त्या तुलनेत पुरवठा कमी होतो आहे. त्यामुळे कापसाचे दर हे तेजीत राहण्याची शक्यता अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कापसाच्या बाबतीतली एक महत्त्वाची अपडेट हाती येत आहे. अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयातीला परवानगी मिळू शकते असं वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव भूपेंद्रसिंह यांनी सांगितले आहे. मात्र या कापसाचे देशात खूपच कमी उत्पादन होते तर महाराष्ट्रात हा कापूस पिकत नाही. त्यामुळे अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयातीचा शेतकऱ्यांच्या दरावर परिणाम होणार नाही असं जाणकारांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री सुरू ठेवावे असेही आवाहन केले जात आहे.

देशात कापसाचे उत्पादन यंदा 348 लाख गाठींवर राहण्याची शक्यता तर अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन पाच लाख गाठींचा दरम्यान राहील त्यामुळे हा कापूस गरजेप्रमाणे दरवर्षी आयात केला जातो. त्यामुळे या कापूस आयातीचा देशावरील कापूस दरावर काहीही परिणाम होणार नाही असे जाणकारांनी सांगितले आहे. अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयातीने देशातील बाजार प्रभावित होणार नाही असंही तज्ञांनी सांगितले आहे.

कापूस आयातीवरील 11 टक्के आयात शुल्क कमी करावे निर्यात बंद करावी तसेच वाद्यांवर बंदी आणावी यासाठी कापड उद्योग मागील काही महिन्यांपासून धडपड करतोय मात्र कापड उद्योगाचा या मागणीला अर्थमंत्री वस्त्रोद्योग मंत्र्यांनी हे भाव दिल्याने त्यामुळे आता फक्त अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयातीसाठी प्रयत्न सुरू आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालय ही अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयातीला परवानगी देण्याचा विचार करू शकते असं वस्त्रोद्योग सचिव उपेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. दरम्यान अतिरिक्त लांब धाग्याच्या कापडाला श्रीमंत वर्गाकडून मोठी मागणी असते तसा च्या धाग्या पासून बनवलेल्या कापडाला निर्यातीसाठी ही मागणी असते देशातील कापड उद्योगाला 15 लाख गाठी अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे आवश्यकता आहे तरी यंदा केवळ पाच लाख गाठी उत्पादन झाल्याची माहिती आहे.

संदर्भ : ऍग्रोवन