शेतकऱ्यांना कांद्याचा आधार ; क्विंटलला सर्वधिक 4393 रुपये भाव…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा या पिकाचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे बऱ्याच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सध्या कांदा पिकानेच शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे . बुधवारी लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला सर्वाधिक 4393 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

लासलगाव बाजर समितीतही कांद्याला चांगला दर

आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे 13 ऑक्टोबर रोजी कमाल किंमत 4134 रुपये होती, तर किमान 1200 रुपये आणि सर्वसाधारण किंमत 3550 रुपये होती. सर्वाधिक किंमत पिंपळगाव मंडी येथे होती. सामान्यत: कांद्याचा वापर हे कमी झालेला आहे. मात्र, नवरात्र उत्सवामुळे हा दर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.पावसामुळे कांद्याची नासाडी झालेली आहे. कांद्याला दर नसला की त्याची साठवणूक करून ठेवली जाते. एप्रिल-मे मध्ये साठवणूक केलेला कांद्याचे पावसामुळे व पूरामुळे मोठे नुकसान झालेले आहे. कांदा हा सडलेल्या अवस्थेत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर आदी ठिकाणी ठेवलेला कांदा पूर आणि पावसात भिजला होता. तर नाशिक, अहमदनगर, धुळे, सोलापूर आणि जळगाव मध्ये अनेक शेतकऱ्यांचे कांदे ओलाव्यामुळे सडले होते. त्यामुळे लासलगाव बाजारपेठेत आवक ही कमी होत आहे. तेव्हा मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत असेल आणि किंमत वाढेली आहे.

भविष्यातही दर वाढण्याचे अंदाज

महाराष्ट्र नंतर उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात असते. मात्र, येथील कांद्यावरही वातावरणाचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झालेला आहे. वादळी वाऱ्याचाही परिणाम कांदा उत्पादनावर झाला असून आता कांद्याच्या दरात वाढ होत आहे. शिवाय उत्पादनात घट झाल्याने भविष्यातही दर वाढतील असाच अंदाज व्यक्त होत आहे.