हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे लिंबूचे भाव गगनाला स्पर्श करत असतानाच कांद्याच्या घसरलेल्या भावाने शेतकऱ्यांना रडवले आहे. होय, गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे घसरलेले भाव शेतकऱ्यांसमोर अडचणीचे ठरत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागला आहे.
कांद्याची योग्य साठवणूक करण्याची सोय नाही, तसेच पीक जास्त काळ ठेवल्यास पीक निकामी होण्याची शक्यता वाढते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत बाजारात जे भाव सुरू आहेत, त्या भावातच कांदा विकावा लागतो आहे.
त्यापेक्षा कांदा फेकलेलाच बरा …
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर, गेल्या दोन महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव सर्वसाधारण २०० ते ९०० रुपये होते, मात्र अचानक कांद्याचे भाव घसरले असून, ते आता २४० रुपयांवरून खाली आले आहेत. बाजारात कांद्याचा किमान भाव १५० रुपये प्रति क्विंटलवर पोहचला आहे. कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे काही शेतकरी शेतातच पिकांची नासाडी करत आहेत. शेतकऱ्यांकडून कांदा फेकून दिला आत आहे. कमी भावात पिकांची विक्री करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हा पर्याय चांगला वाटत आहे. पिकांचा खर्चही मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत त्यांना याशिवाय दुसरा मार्ग समजत नाही असे शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांना सल्ला
शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सुचना करण्यात येत आहे की, त्यांनी आपले पीक काही भागांमध्ये ठेवावे व ते बाजारात विकावे, तसेच ज्यांच्याकडे पिकाची साठवणूक करण्याची योग्य व्यवस्था आहे, त्यांनी पीक साठवून ठेवावे, जेणेकरुन जेव्हा किंमत वाढते तेव्हा ते जास्त किंमतीला विकले जाऊ शकते .