Onion Market Rate: कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा! बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कित्येक दिवस कमी कांदा दरामुळे (Onion Market Rate) नाराज झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या अनेक बाजारपेठेत कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर कांद्याला 30 रुपये प्रति किलोपर्यंत भाव (Onion Market Rate) मिळाला आहे.

कांद्याचे दर (Kanda Bajar Bhav) वाढण्याचे वेगवेगळी कारणे असली तरी यावर सर्वात मोठा प्रभाव हा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा असल्याचे बोलले जात आहे. कांदा उत्पादक पट्ट्यातील मतदारांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मतपेटीतून सरकारविरोधी मतदान केले. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी कांद्याच्या दरात (Onion Market Rate) लक्षणीय वाढ झाली आहे.

दुसरे कारण म्हणजे बाजारात कांद्याची (Onion Market) आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याची निर्यात वाढल्याने आणि स्थानिक बाजारपेठेतील पुरवठा कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत.

वेगवेगळ्या बाजारपेठेतील कांद्याचे दर (Onion Market Rate)

सोलापूर: 33 रुपये प्रति किलो

पुणे: 1600 ते 2000 रुपये प्रति क्विंटल

इस्लामपूर: 1500 ते 3000 रुपये प्रति क्विंटल

चंद्रपूर: 1300 ते 2500 रुपये प्रति क्विंटल

सातारा: 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटल

कांद्याच्या दरात वाढ होण्याचे विविध कारणे असली तरी यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) सुखावला असेल हे नक्की. उशिरा का होईना शेतकर्‍यांच्या कांद्यास चांगले दर मिळत आहेत.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.