Paddy Bonus : धान पिकासाठी प्रति क्विंटल 500 रुपये बोनस; तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय!

Paddy Bonus For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील भात उत्पादक पट्ट्यात रब्बी धान पिकाची (Paddy Bonus) खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. परंतु, लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशातच आता तेलंगणा राज्य सरकारने खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 500 रुपये बोनस (Paddy Bonus) देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी (ता.२०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

36 लाख मेट्रिक टन खरेदी (Paddy Bonus For Farmers)

तेलंगणा राज्य सरकारने रब्बी हंगामातील भात पिकांची किमान आधारभूत किमतीने म्हणजेच हमीभावाने ३६ लाख मेट्रिक टन खरेदी केली आहे. असे तेलंगणा सरकारने म्हटले आहे. याशिवाय तेलंगणा सरकारने खरीप भात लागवडीसाठी बियाणे आणि खतांचे नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तांदूळ खरेदीत राज्य सरकार शेतकऱ्यांना फसवणार नाही, असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बोनसची आशा होती. त्यानुसार त्यांना तेलंगणा सरकारकडून हा बोनस देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात विक्री

तेलंगणा सरकारने धान खरेदीचे 50 लाख टनाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात धान विक्रीला पसंती दिली. सरकारच्या खरेदी भावाच्या तुलनेत खुल्या बाजारात प्रति क्विंटल 300 ते 400 रुपये अधिक भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात धान विक्री केल्याचे व्यापारी सांगतात. दरम्यान, “राज्य सरकारने हमीभावाने भात खरेदी केली आहे. खरेदी रक्कम तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली.

तसेच राज्य सरकारने राज्यातील संपूर्ण तांदूळ हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, याउलट महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मागील दोन वर्षांचा भात खरेदी बोनस शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी हवालदिल असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे.