हॅलो कृषी ऑनलाईन : भाजीपाला आपल्या रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. आज आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्या जाणाऱ्या भाजीपालांची यादी आम्ही आपणांस त्या प्रत्येक भाजीपाला पिकांच्या वाणी पण सांगणार आहोत.
ऑक्टोबर हा असा महिना आहे त्यात ना जास्त थंडी असते ना जास्त गरमपणा असतो, हा महिना शेतकऱ्यांसाठी पण फायदेशीर असतो. ह्या महिन्यात भाजीपाला लवकर सडत नाहीत त्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि परिणामी शेतकरी ह्यातून चांगला पैसा कमवू शकतात. सामान्यता शेतकरी बांधव ऑक्टोबर महिन्यात ब्रोकोली, फुलकोबी, मुळा, टोमॅटो, पालक इत्यादींची लागवड करतात. या भाजीपाला पिकांची लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात. चला तर मग जाणुन घेऊ ह्या भाजीपाला पिकांच्या लागवडिविषयी आणि त्यांच्या सुधारित जातींबद्दल.
मुळ्याच्या सुधारित जाती
पुसा चेतकी – मुळाची ही जात 40-50 दिवसात तयार होते. या मुळ्याच्या जातीतून शेतकरी एकरी 100 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवू शकतो. मुळ्याच्या या जातीची लागवड संपूर्ण भारतात करता येते. ही जातं खुपच पांढरीशुभ्र आणि मऊ असते.
पुसा हिमानी – मुळ्याची ही वाण 50-60 दिवसांत तयार होते. या जातीमुळे शेतकरी एकरी 128 ते 140 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतात. या जातीचा मुळा हा लांब, पांढरा आणि थोडा तिखट असतो.
जपानी सफेद – मुळ्याची ही वाण जवळपास 45-55 दिवसात परिपक्व होते. या जातीमुळे शेतकरी एकरी 100 ते 120 क्विंटल उत्पादन घेऊ शकतात.
ब्रॉकोलीच्या सुधारित जाती
केटीएस -1 :- ब्रोकोलीच्या या जातीचे देठ अतिशय कोमल असतात. या जातीचे सरासरी वजन 200-300 ग्रॅम पर्यंत असते. या जातीचे वैशिष्ठ्य म्हणजे हे रोप लागवडीनंतर 80-90 दिवसांनी तयार होते. ह्या वाणीच्या लागवडीतून शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल.
पालक समृद्धी – ब्रोकोलीच्या या जातीचा देठ लांब आणि कोमल असतो. या जातीचे सरासरी वजन 200-300 ग्रॅम पर्यंत असू शकते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ते लागवडीनंतर 85-90 दिवसांनी तयार होते.
ब्रोकोली संकरीत- 1 :- या ब्रोकोलीच्या जातीचा देठ अतिशय कोमल असतो. या जातीचे सरासरी वजन 600 – 800 ग्रॅम असते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे हे रोप लावणीनंतर 60-65 दिवसांनी तयार होते. या जातीचा वरचा भाग हिरव्या रंगाचा तसेच चांगलेच मजबूत असते.
पालकच्या सुधारित जाती
ऑल ग्रीन – पालकच्या या जातीची पाने हिरवी आणि मऊ असतात. ही वाण जवळपास 15-20 दिवसात परिपक्व होते.
पुसा हरित – पालकाची ही जातं गडद हिरव्या रंगाची तसेच आकाराने मोठी असते. या जातीची लागवड पूर्ण वर्षभर डोंगराळ भागात केली जाऊ शकते. या जातीचे पालक वरच्या दिशेने वाढतात. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात सर्व प्रकारचे हवामान आणि जमिनीत घेतले जाऊ शकते. ह्या जातीला सर्व प्रकारांचे हवामान मानवते.
फ्लॉवरच्या काही सुधारित जाती
फ्लॉवरच्या लागवडीसाठी ऑक्टोबर महिना खुपच योग्य मानला जातो. फ्लॉवरच्या काही सुधारित जाती :- जपानी, पुसा दिवाळी, पुसा कटकी, पंत शुभ्र इत्यादी, ह्या जातींची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात.