हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना (Poplar Farming) फाटा देत, अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांच्या लागवडीचा मार्ग अवलंबत आहे. यात काही शेतकरी महागडे लाकूड मिळवून देणाऱ्या वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणात करताना आढळून येत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील पीक पद्धतीत बदल करून महागड्या लाकूड उत्पादनाच्या माध्यमातून, वनस्पती पिकांचे उत्पादन घेण्याचा विचार करत असाल. तर पॉप्युलर (चिनार) वनस्पतीची शेती तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. आज आपण पॉप्युलर या झाडाच्या शेतीबाबत (Poplar Farming) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसे लागते हवामान? (Poplar Farming In India)
आपल्या देशात सध्या चिनार या झाडाची शेती (Poplar Farming) सध्या चांगलीच बहरत आहे. विशेष म्हणजे या वनस्पतीचे लाकूड हे पेपरनिर्मिती आणि आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते. ज्यामुळे त्यास मोठ्या प्रमाणात मागणी असते. याशिवाय चिनार या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. या झाडाच्या सालीचा देखील आयुर्वेदिक वापर होतो. त्यामुळे देशभरातच नाही विदेशात देखील या लाकडाला मोठी मागणी आहे. चिनार या झाडाच्या लागवडीसाठी 5 अंश सेल्सिअस ते 45 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
किती मिळते उत्पादन?
कोणत्याही पिकाची शेती करण्यापूर्वी त्यातून किती उत्पन्न मिळते? हा प्रश्न सर्वात पहिले समोर येतो. बाजारात या झाडाचे लाकूड खूप महाग असते. उपलब्ध माहितीनुसार, चिनार झाडाचे लाकूड 700 से 800 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जाते. एका झाडाची लाकडे हे जवळपास दोन हजार रुपयाला विकली जातात. एका हेक्टरमध्ये 250 झाडे लावली जाऊ शकतात. ज्यातून शेतकऱ्यांना हेक्टरी 8 ते 10 लाख रुपये इतकी कमाई होऊ शकते. ज्यामुळे शेतकऱ्यांना बक्कळ कमाई मिळवण्यासाठी चिनार झाडाची शेती योग्य असणार आहे.
कुठे होतो वापर?
चिनार झाडांना थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो. या झाडाचा उपयोग कागद निर्मिती, हलके प्लायवूड बनवण्यासाठी, काड्या, बॉक्स इत्यादी तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय शेतकरी या झाडांमध्ये गहू, ऊस, हळद, बटाटा, धने, टोमॅटो यासारखी नियमित पिके आंतरपीक म्हणून घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कमी जमिनीत दुप्पट उत्पन्न घेण्यास मदत होणार आहे.